Indian Cricket Team e sakal
क्रीडा

भारतीय क्रिकेटर्संना COVISHIELD लस घेण्याचा सल्ला

या सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी खेळाडू आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकणार आहेत.

सुशांत जाधव

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या 14 व्या हंगाम निम्म्या सामन्यानंतरच स्थगित करण्यात आलाय. भारतातील लोकप्रिय स्पर्धा स्थगित झाल्यानंर टीम इडिया (Indian Cricket Team) आता इंग्लंडमध्ये (England) होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) तयारी लागली आहे. इंग्लंडमध्ये भारत (Indian Cricket Team ) आणि न्यूझीलंड (New Zealand national cricket team) यांच्यात फायनल लढत रंगणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी खेळाडू आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकणार आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू कोरोना लस घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. प्रसारमाध्यातील वृत्तानुसार, भारतीय खेळाडू कोविशिल्ड (Covishield Vaccine) लस घेणार असल्याची चर्चा आहे. भारत सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना लसीकरण सुरु केलीये. त्यामुळे भारतीय खेळाडूही कोरोनाची लस घेण्यास तयार आहेत. आयपीएल स्पर्धेवेळीच खेळाडूंचे लसीकरण होणार, अशी चर्चा रंगली होती. पण आयपीएल स्पर्धाच स्थगित झाल्यामुळे हा प्लॅन बारगळला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना कोरोना लस देण्यात येणार का? असा प्रश्न बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना विचारण्यात आला होता. यावर गांगुली म्हणाले की, सध्याच्या घडीला खेळाडूंकडे मोकळा वेळ आहे. राज्य सरकारने कोरोना लसीकरणाला सुरुवात केली असून खेळाडू वैयक्तिकरित्या लस घेऊ शकतात. जे खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहेत त्या खेळाडूंनी केवळ कोविशील्ड व्हॅक्सिन घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

भारतीय खेळाडूंनी कोविशील्डचा पहिला डोस भारतात घेतला तर दुसऱ्या डोससाठी त्यांच्याकडे वेळ नसेल. परंतु कोविशील्ड ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका व्हॅक्सिन इंग्लंडमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना दुसरा डोस सहज उपलब्ध होईल. त्यामुळेच इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंनी कोविशील्ड लस घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.

कोविड-19 लसीकरण नियमावलीनुसार, कोरोनाचा कोणतीही लस घ्यायची झाल्यास त्याचे दोन डोस घेणं अनिवार्य आहे. पहिला डोसवेळी जी लस घेतली त्याच लशीचा दुसरा डोस घ्यावा लागेल. त्यामुळेच इंग्लंडला जाणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना कोविशील्ड लस घेण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT