MS Dhoni esakal
क्रीडा

Oreo पेक्षा भजीची चव चांगली'...टीम इंडियाच्या पराभवानंतर झोमॅटोचे ट्विट व्हायरल

टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी महेंद्र सिंह धोनीने ओरिओ बिस्किट पुन्हा लॉन्च केले होते.

धनश्री ओतारी

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या संघानं रोहित शर्माच्या टीम इंडियाचा धुव्वा उडवला. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. दरम्यान, या पराभवानंतर ओरिओ बिस्कीटवर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडीयावर करण्यात येत आहे. तसेच झोमॅटोचे एक ट्विटही चर्चेत आले आहे. (Oreo and T20 World Cup 2022 MS Dhoni Zomato tweet goes viral after Team India defeat)

टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी महेंद्र सिंह धोनीने ओरिओ बिस्किट पुन्हा लॉन्च केले होते. भारताच्या पराभवानंतर ओरिओसोबत महेंद्रसिंह धोनीवरही निशाणा साधला जात आहे. लाजिरवाण्या पराभवानंतर सोशल मीडियावर ओरीओ बिस्किटही ट्रेंड होत आहे.

काय आहे कारण?

ओरीओ बिस्किटचे लॉंचिंग करताना धोनीने, ओरिओ देखील 2011 मध्ये लॉन्च केले गेले आणि त्यानंतर भारताने वर्ल्ड कप जिंकला. जर ओरिओ पुन्हा लॉन्च झाल्यास भारत वर्ल्ड कप जिंकेल. असे मोठे विधान केले होते.

पण धोनीचे हे भविष्य खरे ठरलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर ओरिओ बिस्कीटवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

ओरिओच्या कार्यक्रमात, '2011 मध्ये ओरिओ लॉन्च करण्यात आले तेव्हा भारत वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्षी आणखी एक कप आहे. जर ओरिओ पुन्हा लॉन्च करण्यात आले, तर भारत पुन्हा वर्ल्ड कप जिंकू शकतो. त्यामुळे ओरिओ पुन्हा लॉन्च करण्यात यावे, असे धोनीने म्हटले होते.

मात्र आता इंग्लंडकडून पराभव झाल्यामुळे भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. यावरुन आता ओरिओ आणि महेंद्रसिंह धोनीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताच्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी ओरिओला ट्रोल करण्यात सुरुवात केली आहे. झोमॅटोने ट्विट करत, 'ओरिओ भजीची चव या पराभवापेक्षा अधिक चांगली असती,' असे म्हटले आहे.

तर दुसऱ्या एका युजरने 'दुर्दैवाने ओरिओ बिस्किटांची जाहिरात करताना धोनी विसरला की तो सध्याच्या संघात नाही. धोनीच्या कर्णधारपदाची उणीव जाणवतेय, असे म्हटले आहे.

इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी दमदार फलंदाजी करत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. भारताने 20 षटकात 6 गडी गमावून 168 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 16व्या षटकातच 170 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT