aus vs pak match Sakal
क्रीडा

PAK vs AUS : ऑस्ट्रेलियन कॅप्टनमध्ये दिसली 'थॉर'ची झलक

बाबर आझमचे ऑस्ट्रेलिया संघाला कडव्या भाषेत उत्तर

सकाळ वृत्तसेवा

Pakistan vs Australia, 2nd Test : ऑस्ट्रेलियन संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. रावलपिंडीच्या मैदानावर झालेला पहिला सामना अनिर्णित ठरला होता. रावळपिंडीची खेळपट्टी खराब असल्या कारणाने ऑस्ट्रेलिया-पाक खेळाडूशिवाय खेळपट्टीचीच अधिक चर्चा झाली. दोन्ही संघांनी या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली होती. पाकिस्तान संघाच्या (Pakistan Cricket Team) फलंदाजानाही चांगली फलंदाजी केली होती. हा सामना अनिर्णित राहिला.

त्यानंतर दुसरा सामना कराचीच्या मैदानात सुरू आहे. सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ऑस्टेलिया संघाने पहिला डाव 9 बाद 556 धावांवर घोषित केला होता. पाकिस्तानचा संघ धावांचा पाठलाग करताना सर्व बाद 148 धावा करू शकला होता.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने 2 बाद 97 धावांवर डाव घोषित केला होता. पाकिस्तान संघाच्या दुसऱ्या डावाची सुरूवात चांगली केली होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांना विकेट मिळत नसल्याने ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने हातोडा घेऊन स्पीच ठोकण्यास सुरूवात केल्याचा व्हिडिओ पाकिस्तान संघाच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंना गोलंदाजी करताना खराब स्पीचमुळे अडथळा निर्माण होत असल्याने कर्णधार पॅट कमिंन्सने खेळपट्टीवर हातोडा मारल्याचे पाहायला मिळाले. हा प्रकार पाहून पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने पंचांकडे याबद्दल नाराजीही व्यक्त केली. बाबर आझमने या सामन्यात दीडशतकी खेळी खेळली आहे. बाबर अजून खेळपट्टीवर खेळत आहे. पाकिस्तानाचा संघ हा सामना जिंकण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Crime: भाजप नेत्याने महिला डॉक्टरला गुंगीचे औषध देऊन बनवला अश्लील व्हिडिओ ; गुन्हा दाखल, पक्षात मोठी फूट

Koyna Dam Water: कोयनेतील ‘महाजनको’चा कोटा संपुष्टात; वीजनिर्मितीवर परिणाम, राज्यात भारनियमनाचे संकट, सातारा-सांगलीसमोर पाणीटंचाईचे संकट

Monsoon Delay India : मान्सून श्रीलंकेतच रेंगाळला, केरळमध्ये 'या' दिवशी धडकणार; महाराष्ट्रातही आगमन लांबणीवर? IMD चा नवा अंदाज समोर

Maharashtra Cabinet Delhi visit: दिल्लीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाची धडक; साखर, कांदा आणि जलजीवन मिशनवर निर्णायक बैठक, शेतकरी आणि पाणी प्रश्नांवर मंथन

Summer Refreshing Drinks: उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहण्यासाठी बनवा थंडावा देणारे बडीशेपचे सरबत! लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT