David Warner Sakal
क्रीडा

PAK vs AUS : खराब पिचवर वॉर्नर नाचला; व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

रावळपिंडी: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिला कसोटी सामना रावळपिंडीच्या मैदानात (Rawalpindi Cricket Stadium) खेळवण्यात आला. दोन्ही संघातील हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. खराब खेळपट्टीवरुन हा कसोटी सामना चर्चेत असताना आता आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

रावळपिंडीच्या मैदानातील खेळपट्टी गोलंदाजांसाठी अजिबात पूरक नव्हती. परिणामी पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 4 बाद 476 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने देखील पहल्या डावात 459 धावा करुन खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असल्याचे सिद्ध केलं. चौथ्या आणि पाचव्या दिवशी गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाही. पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात बिन बाद 252 केल्या.

बोरिंग टेस्ट मॅचमध्ये 35 वर्षीय ऑस्ट्रेलियन सलामीवीराने आपल्या तोऱ्यात जान भरली. डेविड वॉर्नर (David Warner) रावळपिंडीच्या मैदानात भांगडा करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. यात वॉर्नर भांगडा करताना दिसते.

पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 114 चेंडूत 68 धावांची खेळी केली होती. अर्धशतकी खेळीत त्याने 12 चौकार लगावले होते. एवढेच नाही तर पहिल्या विकेटसाठी त्याने उस्मान ख्वाजाच्या साथीनं 156 धावांची भागीदारी करुन ऑस्ट्रेलियन संघाला दमदार सुरुवात करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

7 Minute 11 Second व्हायरल MMS पासून ते 'धुरंधर 2' सीन लीक क्लिपपर्यंत...जानेवारीमध्ये 'हे' टॉप 10 व्हिडिओ होते ट्रेंडिंग

"आमच्या प्रेमात ज्ञानदाने खूप सोसलं" होणाऱ्या नवऱ्याने सांगितली लव्हस्टोरी "आमच्या कास्ट वेगळ्या.."

Latest Marathi News Live Update: लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

Palghar Fire: पालघरमध्ये आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट! फर्निचर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, Viral Video

SCROLL FOR NEXT