PAK vs ENG Final T20 World Cup 2022  esakal
क्रीडा

PAK vs ENG Final: मेलबर्नवरील पाऊस पाहता ICC ने उचलले मोठे पाऊल; आता सामना...

अनिरुद्ध संकपाळ

PAK vs ENG Final T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 ची फायनल रविवारी मेलबर्न येथे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे. जरी अतिरिक्त दिवसाची सोय असली तरी त्या दिवशी देखील पाऊस असल्याने आयसीसीचे टेन्शन वाढले होते. त्यामुळे आयसीसीने आपल्या नियमात बदल करत एक मोठा निर्णय घेतला आहे.

आयसीसीने अतिरिक्त दिवसाच्या खेळाची वाढीव वेळ ही 2 तासावरून 4 तासावर नेली आहे. आयसीसीचे प्लेईंग कंडिशन नियाम क्रमांक 13.7.3 नुसार असामान्य परिस्थितीत सामन्याच्या ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक दोन तास खेळ पुढे नेता येतो. मात्र टी 20 वर्ल्डकपची हाय व्होल्टेज फायनल पाहता सामना खेळवण्यासाठी आयसीसी शक्य तितके प्रयत्न करत आहे. त्यामुळेच अतिरिक्त वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयसीसी टी 20 वर्ल्डकपची रविवारची फायनल पावसात वाहून जाऊ नये म्हणून सगळे प्रयत्न करत आहे. जर रविवारी सामना पूर्ण होऊ शकला नाही तर तो सामना सोमवारी खेळवला जाईल. जर रविवारचा सामना पावसामुळे अर्धवट राहिला असेल तर तो सोमवारी जिथून सामना थांबला होता तिथून पुढे खेळवण्यात येणार आहे.

रविवारी सामना पूर्ण करण्यासाठी अर्धा तास अतिरिक्त वेळ राखून ठेवण्यात आली आहे. तर सोमवारी सामन्याच्या वेळेव्यतिरिक्त अधिकचे 4 तास राखून ठेवण्यात आले आहेत. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हरवर सामन्याचा निकाल लागले. जर सुपर ओव्हर पूर्ण होऊ शकली नाही तर पाकिस्तान आणि इंग्लंड यांना संयुक्तरित्या विजेतेपद बहाल करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT