ramiz raja sakall
क्रीडा

VIDEO : पाकिस्तानच्या पराभवानंतर रमीझ राजा संतापला; भारतीय पत्रकाराशी केले भांडण

Kiran Mahanavar

Pakistan vs Sri Lanka Asia Cup 2022 : आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत विजयाचा षटकार मारला. श्रीलंकेने आशिया कपवर सहाव्यांदा नाव कोरले. यजमानांनी स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध गमावला होता पण त्यानंतर सलग पाच सामने जिंकून आशिया कप 2022 ची ट्रॉफी जिंकली. पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा स्टेडियमबाहेर काही पत्रकारांशी संवाद साधला त्यादरम्यान तो खूप संतापलेला दिसला.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाक संघाने सुरुवात चांगली केली. खराब सुरूवात करणाऱ्या श्रीलंकेने नंतर दमदार कमागिरी करत सामन्यावर नियंत्रण ठेवले. श्रीलंकेकडून भानुका राजापक्षेने 45 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. लंकेच्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 147 धावांत संपुष्टात आला.

सामन्यानंतर जेव्हा भारतीय पत्रकाराने रमीझ राजाला विचारले की पाकिस्तानी जनतेसाठी तुमच्याकडून काही संदेश, जे या पराभवामुळे खूप नाराज असतील. या प्रश्नावर रमीझ राजा संतापला सर्वांसमोर पत्रकाराचा फोन खेचताना दिसला. रमीज राजाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

आशिया कप 2022 च्या फायनलमध्ये भानुका राजपक्षे श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला. राजपक्षेने 45 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 71 धावा केल्या तर वानिंदू हसरंगाने 21 चेंडूत 36 धावा केल्या. दोघांनी 58 धावांची जलद भागीदारी केली, तर एका क्षणी श्रीलंकेची धावसंख्या पाच गडी बाद 58 अशी होती. या भागीदारींच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानला 171 धावांचे लक्ष्य दिले. धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांच्या खेळात 147 धावांवर सर्वबाद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT