pakistan and pcb 2025 champions 
क्रीडा

Champions Trophy: आशिया कपनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का, ICCने चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपदही हिसकावले?

Kiran Mahanavar

ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अजूनही आशिया चषकाच्या यजमानपदावरून वाद करत आहे. या स्पर्धेचे यजमानपद त्यांना मिळाले आहे, मात्र बीसीसीआयने पाकिस्तानला संघ पाठवण्यास नकार दिला आहे. यानंतर पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी हायब्रीड मॉडेलवर स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव आशियाई क्रिकेट परिषदेला दिला.

बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डांनी हायब्रीड मॉडेल नाकारले आहे. दरम्यान, आता बातम्या येत आहेत की आयसीसी 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफीची जागा बदल्या जाऊ शकते. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असेल.

2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानऐवजी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला मिळू शकते. यापूर्वी 2024 मध्ये वेस्ट इंडिज-अमेरिकेत होणारा टी-20 विश्वचषक इंग्लंडमध्ये हलवण्याची चर्चा होती. अमेरिकेतील क्रिकेटची मैदाने अद्याप आयसीसीच्या मानकांसाठी योग्य नाहीत.

टी-20 विश्वचषक अमेरिकेतून हलवण्यात आल्याने त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. आयसीसी स्पर्धा रद्द केल्याच्या बदल्यात पाकिस्तानला काही नुकसानभरपाई मिळू शकते.

टी-20 वर्ल्ड आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्थळ बदलण्याबाबत विविध मंडळांमध्ये चर्चा सुरू आहे. यामध्ये आयसीसीचाही समावेश आहे. आयसीसीचा पुढचा प्रसारकही याला सहमत आहे. 2007 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे सामने खेळले गेले. त्यानंतर टीम इंडिया पहिल्याच फेरीत बाहेर पडली आणि आयसीसीचे मोठे नुकसान झाले. पण ब्रॉडकास्टर्सना भारतीय प्राइम टाइमला प्राधान्य हवे आहे. लक्षात घ्या की 1996 च्या विश्वचषकानंतर पाकिस्तानमध्ये एकही ICC स्पर्धा खेळली गेली नाही.

ज्या देशांना आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे, त्या देशांनी अद्याप यजमानपदावर स्वाक्षरी केलेली नाही. जुलैमध्ये डर्बन येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत ही प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला यासाठी तयार करू शकते. त्याऐवजी त्याला भरपाई दिली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT