Babar Azam twitter
क्रीडा

भारतीयांच्या हॅटट्रिकनंतर पाक कॅप्टनचा लागला नंबर

सुशांत जाधव

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी मालिकेत नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. बाबरच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वला डावाने पराभूत केले. या विजयापाठोपाठ बाबरला एप्रिल महिन्यातील महिन्यातील प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player Of The Month) पुरस्कार मिळाला आहे. एप्रिलमध्ये स्टायलिश फलंदाजाने 3 वनडे मॅचमध्ये 76 च्या सरासरीने 228 धावा केल्या आहेत. 7 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 43.57 सरासरीने त्याने 305 धावा कुटल्या आहेत.

आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये त्याने अव्वलस्थानी झेप घेतली होती. एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी बाबरसोबत पाकिस्तानचा फलंदाज फखर झमान (Fakhar Zaman) आणि नेपाळचा युवा फलंदाज कुशल भरतेल (Kushal Bhurtel) यांच्या नावे शर्यतीत होती. अखेर बाबरने यात बाजी मारली.

एप्रिलमध्ये पाकिस्तानी संघाने दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बाबर आझमने 3 वनडे आणि 4 टी 20 सामने खेळले. झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 मालिकेत बाबरने विराट कोहलीचा विक्रम मागे टाकला होता. त्याने सर्वाधिक जलद 2000 धावा करण्याचा पराक्रम आपल्या नावे केला. यापूर्वी 26 वर्षीय पाकिस्तानी कॅप्टनने विराट कोहलीच्या जागेवर कब्जा करत वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थान मिळवले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात बाबरने 82 चेंडूत 94 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर त्याने कारकिर्दीतील सर्वोच्च 865 अंकासह वनडेत अव्वलस्थान पटकावले. तिसऱ्या टी20 सामन्यात त्याने 59 चेंडूत 122 धावा केल्या होत्या.

यंदाच्या वर्षीपासून आयसीसीने सुरु केलेल्या प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराचा पहिला मानकरी हा रिषभ पंत ठरला होता. जानेवारीमध्ये त्याला या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये रविचंद्रन अश्विन, मार्चमध्ये भुवनेश्वर कुमार या तीन भारतीय खेळाडूंनी लागोपाठ पुरस्कार मिळवल्यानंतर आता बाबर आझमचा नंबर लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inside Story Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बंद दाराआड काय घडली चर्चा, राजू शेट्टींनी सांगितली इनसाईड स्टोरी...

Suhas Shetty Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे PFI चा कट उघड, NIA चा धक्कादायक अहवाल, 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Latest Marathi News Live Update : खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; खरीप हंगामातील धान पिकाची राखरांगोळी, नुकसानीमुळे बळीराजा संकटात

Kolhapur MPSC Student : एमपीएससीत कोल्हापूरचा डंका! कसबा बावड्याची सायली राज्यात दुसरी, इचलकरंजीचा तन्मय सातवा

SCROLL FOR NEXT