Bismah Maroof  Sakal
क्रीडा

Maternity Leave नंतर पाकिस्तानची खेळाडू वर्ल्ड कपसाठी सज्ज

सुशांत जाधव

पाकिस्तानची बॅटर आणि माजी कर्णधार बिस्माह मारुफ (Former Pakistan captain Bismah Maroof ) आगामी वनडे वर्ल्ड कप (2022 Women’s ODI World Cup ) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध असणार आहे. महिला वर्ल्ड कप स्पर्धा 2021 मध्ये नियोजित होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेचे वेळापत्रक कोलमडले. नव्या वर्षात 2022 मध्ये मार्च आणि एप्रिल दरम्यान न्यूझीलंडमध्ये महिला वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी बिस्माह सज्ज झाली आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघाची एकमेकांसोबत एक-एक लढत होईल. आघाडीचे चार संघ सेमी फायनल खेळतील.

एप्रिल 2021 मध्ये बिस्बाहनं मातृत्वसाठी (motherhood) क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. ट्विटरच्या माध्यमातून नव्या जबाबदारीसाठी संघापासून दूर होत असल्याची माहिती तिने दिली होती. या निर्णयासाठी तिने दक्षिण आफ्रिकेचा दौराही सोडला होता. तिच्या अनुपस्थितीत जवेरिया खान (Javeria Khan) हिने पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले होते. ऑगस्टमध्ये मारुफनं मुलीला जन्म दिला. याची माहितीही तिने ट्विटच्या माध्यमातून दिली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मातृत्व रजा मंजूर केलेली (maternity leave ) मारुफ ही पाकिस्तानची पहिली महिला क्रिकेटरही ठरली होती.

क्रिइन्फोच्या वृत्तानुसार, कमबॅक करण्यासाठी मारूफ सज्जी झालीये. यासंदर्भात ती म्हणाली की, "मागील काही दिवस आयुष्यातील आनंदाचे सर्वोत्तम क्षण अनुभवत आहे. आई झाल्यानंतर मुलीसोबत घालवलेला वेळ हा खूप वेगळा अनुभव होता. आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान संघाचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रसूती रजा मंजूर केल्यानं मुलाचे संगोपन करणे आणि क्रिकेट कारकिर्द टिकवून ठेवण सहज शक्य झाले, असे म्हणत तिने बोर्डाचे आभारही मानले आहेत. मी आता पाकिस्तान संघाकडून पुन्हा खेळण्यास सज्ज आहे. मातृत्वानंतर माझ्या महत्तकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असेल. न्यूझीलंडमध्ये चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे, असेही तिने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT