Babar Azam 
क्रीडा

PAK vs NZ : कर्णधार बाबरचे शतक अन् रिझवानच्या अर्धशतकाने न्यूझीलंडचा पराभव, पाकिस्तानचा सलग दुसरा विजय

न्यूझीलंडविरुद्ध बाबर आझमने ठोकले शतक

Kiran Mahanavar

Pakistan Beat New Zealand : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना लाहोरमध्ये खेळला गेला. यामध्ये पाकिस्तानने शानदार विजय नोंदवला. या सामन्यात बाबर आझमने शानदार शतक झळकावले. त्याने 58 चेंडूत 101 धावांची खेळी केली. त्याच मोहम्मद रिझवाननेही अर्धशतक झळकावले. या दोन खेळाडूंच्या जोरावर पाकिस्तान संघाने 192 धावा केल्या. पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ केवळ 154 धावाच करू शकला.

पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. बाबर आझम हा न्यूझीलंडविरुद्ध टी-20 शतक झळकावणारा पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरला. त्याने 58 चेंडूत ही कामगिरी केली, ज्यात 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याचे T20I कारकिर्दीतील हे तिसरे शतक होते. बाबरने किवी संघाविरुद्ध नाबाद 101 धावांची खेळी केली.

मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांच्या शानदार खेळीशिवाय फखर जमान (0), सई अयुब (0) आणि इमाद वसीम केवळ 2 धावा करू शकले. इफ्तिखार अहमदने 19 चेंडूत उत्कृष्ट 33 धावा केल्या. अशा प्रकारे पाकिस्तानच्या संघाला एकूण 193 धावा करता आल्या.

या धावसंख्येचा पाठलाग करण्यात न्यूझीलंड अपयशी ठरला. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज टॉम लॅथमला 20 चेंडूत 19 धावा करता आल्या. याशिवाय चॅड बोवेसने 24 चेंडूत 26 धावा केल्या. मार्क चॅम्पमने शानदार अर्धशतक केले, त्याने 40 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. याशिवाय एकाही किवी खेळाडूला सर्वोत्तम खेळी खेळता आली नाही. परिणामी न्यूझीलंडने हा सामना 38 धावांनी गमावला.

या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 27 धावा देत 4 बळी घेतले. पाकिस्तानच्या संघाने सलग दुसरा T20 जिंकला आहे. आता त्याची नजर न्यूझीलंडला क्लीन स्वीप करण्यावर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT