Babar Azam sakal
क्रीडा

Babar Azam: बाबरचाही विराट कोहली होणार; पाकिस्तान भारतातीच कॉपी करणार

बाबर आझमचे कसोटी कर्णधारपद जाणार!

Kiran Mahanavar

Babar Azam : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. तसं पाहिलं तर पाकिस्तानी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर त्याना सलग चार कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडपूर्वी पाकिस्तानलाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

माजी पाकिस्तानी क्रिकेटर रमीझ राजाला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अध्यक्षपदावरून बुधवारी हटवण्यात आले. आता पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक हेही आपले पद सोडू शकतात. त्याचबरोबर बाबर आझमला कसोटी कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. पीसीबीच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, माजी ऑफस्पिनर सकलेन न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेनंतर पद सोडू शकतो.

पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांच्या गद्दाफी स्टेडियममधील कार्यालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम देखील सहभागी झाला होता. सूत्राने सांगितले की बाबर, सकलेन आणि वसीम यांनी राजाला सांगितले की पाकिस्तानचा कसोटी मालिका का पराभव झाला. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत संघातील प्रत्येक पैलू, निवडीचे मुद्दे, कर्णधारपद आणि सकलेनची भूमिका यावर चर्चा झाली.

सूत्राने सांगितले की, बोर्डाला असेही वाटते की बाबरने केवळ मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व करावे आणि कसोटी फॉरमॅटचे कर्णधारपद शान मसूद किंवा मोहम्मद रिझवानकडे सोपवले जावे. यावरून असे दिसत आहे की बाबर आझमचा पण विराट होत आहे. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीनेही कसोटी कर्णधारपद सोडले होते. टीम इंडियाने कसोटी मालिका 1-2 ने गमावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT