Pakistan Cricket Palestine flag esakal
क्रीडा

Pakistan Cricketer Palestine flag : पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर आझमला पॅलेस्टिन प्रेम भोवलं; पीसीबीनेच केली मोठी कारवाई?

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Cricket Palestine flag : पाकिस्तानचे स्टार क्रिकेटपटू भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात पॅलेस्टिनचे समर्थन करताना दिसले होते. मात्र आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेच पाकिस्तानचा स्टार खेळाडू आझम खानवर पॅलेस्टिनच्या झेंड्याचे स्टिकर बॅटवर लावल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली आहे.

कराची येथील राष्ट्रीय स्तरावरील टी 20 सामन्यात आझम खानने किट आणि वस्तूंबाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन केले. पाकिस्तानमधील जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार आझमने आपल्या बॅटवर पॅलेस्टिनचा झेंडा स्टिकर म्हणून लावला होता.

त्याने अधिकाऱ्यांना त्याच्याकडे असलेल्या सर्व बॅटवर हेच स्टिकर असल्याचे देखील सांगितले होते. ही घटना कराची व्हाईट्स आणि लाहोर ब्लू या सामन्यादरम्यान झाली.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, 'तरूण आझम खानच्या मॅच फी मधून 50 टक्के रक्कम दंड म्हणून कापून घेण्यात आली आहे. यापूर्वी आझम खानला सामनाधिकाऱ्यांनी मान्यता नसलेले स्टिकर (पॅलेस्टिनचा झेंडा) बॅटवर न लावण्याची ताकीद दिली होती. मात्र त्याने आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केलं. त्यामुळे पीसीबीला त्याच्यावर कारवाई करणे भाग पडलं.

आझम खानने गेल्या दोन सामन्यात देखील आपल्या बॅटवर तेच स्टिकर वापरलं होतं. आयसीसीच्या कपडे आणि क्रीडा साहित्यांबाबतच्या नियामांनुसार, खेळाडूंना आपल्या कपड्यांवरील लोगो किंवा क्रीडा साहित्यावरील स्टिकरवरून कोणताही राजकीय, धार्मिक किंवा वर्णद्वेशी संदेश देण्याची परवानगी नाही.

पाकिस्तानचा विकेटकिपर फलंदाज मोहम्मद रिझवानने वनडे वर्ल्डकपमध्ये ज्यावेळी श्रीलंकेविरूद्धची आपली ऐतिहासिक खेळी ही गाझामधील भाऊ आणि बहिणींना समर्पित केली होती त्यानंतर आयसीसीने याबाबत नियम प्रसिद्ध केला.

पाकिस्तानी क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करत आहे. पीसीबीने रावळपिंडीमध्ये सराव सत्राचे आयोजन केले आहे. या आठवड्याच्या शेवटी पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावेळी भाजप खासदार-आमदारावर हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

Diwali 2025 Home Makeover: दिवाळीपूर्वी घराला रंग देताय? मग वास्तूनुसार 'या' शुभ रंगांची करा निवड

Latest Marathi News Live Update : नागपूरच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अचानक छापा

SCROLL FOR NEXT