Wasim Akram Sakal
क्रीडा

आधी PCB कडून सन्मान; आता ICC नं दाखवला वासिमचा 'आक्रमक' अंदाज

सुशांत जाधव

पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज आणि 'स्विंगचा सुल्तान' वासिम आक्रम (Wasim Akram) यांचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विशेष सन्मान केला. पीसीबीने (PCB) त्यांना हॉल ऑफ फेम (PCB Hall of Fame) च्या यादीत स्थान दिले. वेस्ट इंडीजचा दिग्गज विवियन रिचर्ड्स यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. आक्रम पाकिस्तानचा आठवा असा खेळाडू आहे ज्याला पीसीबी हॉल ऑफ फेमच्या यादीत स्थान मिळाले आहे.

याआधी अब्दुल कादिर, फजल महमूद, हनीफ मोहम्मद, इमरान खान, जावेद मियांदाद, वकार युनिस आणि झहीर अब्बास यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आक्रम यांनी पाकिस्तान बोर्डाचे आभार मानले आहेत. त्यानंतर आयसीसीने त्यांचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय.

आयसीसीने जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात वासिम आक्रम यांटा सुरुवातीच्या काळाती भेदक मारा पाहायला मिळत आहे. हवेत नाचणाऱ्या चेंडूवर आक्रमक प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना नाचवताना दिसते. एका मागून एक विकेट घेत प्रतिस्पर्ध्याची हवा ताईट करण्याचा सिलसिलाच त्यांनी लावल्याचे दिसते.

पाकिस्तानचा माजी डावखुरा जलदगती गोलंदाजाने एककाळ गाजवला आहे. त्यांची स्विंग होणारा चेंडू भल्या भल्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडायचा. आपल्या कारकिर्दीत आक्रम यांनी 104 कसोटी सामन्यात 414 विकेट घेतल्या आहेत. वनडेत 356 सामन्यात त्यांच्या खात्यात 502 विकेट्सची नोंद आहे. वनडेमध्ये पाचशे बळी मिळवण्याचा टप्पा पार करणारे वासिम आक्रम हे पहिले गोलंदाज आहेत. नव्वदीच्या दशकात आक्रम नावाचा दबदबाच पाहायला मिळाला होता. पाकिस्तानकडून भेदक मारा करणाऱ्या वासिम आक्रम यांच्या फलंदाजीचीही क्षमता होती. कसोटीत त्यांच्या नावे एका द्विशतकाचीही नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT