pakistan may boycott 2023 odi world cup 
क्रीडा

जय शाहच्या वक्तव्यानंतर PCB ची BCCI ला धमकी - वाचा काय आहे प्रकरण

रमीझ राजाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत केले मोठे विधान

Kiran Mahanavar

Pakistan May Boycott 2023 ODI World Cup : पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ खेळायला जाणार की नाही. याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. हे वक्तव्य समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून संघ माघार घेऊ शकतो, अशी बातमी समोर आली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भारताशी क्रिकेट संबंध पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. दोन्ही संघ आपापसात कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानऐवजी इतरत्र आयोजित केल्यासच टीम इंडिया बहुदेशीय स्पर्धांमध्ये खेळेल. पाकिस्तानच्या चॅनल जिओ टीव्हीनुसार PCB 2023 मध्ये भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार टाकू शकते.

पीटीआयच्या एका पीसीबी सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आता पीसीबी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेणार आहे. या बहु-सांघिक स्पर्धांमध्ये जो पाकिस्तान टीम इंडियासोबत खेळला नाही, तर ICC आणि ACC इव्हेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचे नुकसान होऊ शकते हेही त्याला माहीत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोरमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या बैठक झाली ज्यामध्ये बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या वक्तव्यावर चर्चा करण्यात आली. पुढच्या वर्षी पाकिस्तानात होणारा आशिया चषक बाहेर हलवल्यास पीसीबीने मोठे पाऊल उचलल्याची बातमी समोर येत आहे. ते म्हणाले की, बीसीसीआयचे सचिव आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेले जय शाह सर्व निर्णय स्वत: घेऊ शकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger : ५० कोटींचे डील, प्रत्येकाला १५ कोटी अ‍ॅडव्हान्स, राऊतांचा आरोप; दिल्लीत दाखल झालेले ठाकरेंचे ६ खासदार कोण?

Kolhapur Water Update : नऊ नद्यांवरील उपसाबंदी शिथिल; 'इरिगेशन फेडरेशन'च्या मागणीनंतर 'जलसंपदा'चा निर्णय, पाहा तुमच्या भागातील नदीचा समावेश आहे का?

Uddhav Thackeray MP: ठाकरेंच्या ६ खासदारांभोवती राजकीय सस्पेन्स कायम! अपात्रतेचा धोका की नवा राजकीय डाव? कायदा नेमकं काय सांगतो?

Fifa World Cup 2026 : लिओनेल मेस्सीची हॅटट्रिक, वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी अन् अश्रू अनावर; अर्जेंटिनाचा अल्जेरियावर दणदणीत विजय

Global Inflation: युद्ध संपले तरी महागाईची धग कायमच! इंधन, प्रवास, मालवाहतूक दर लगेच कमी होणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT