Pakistan Pacer Haris Rauf Fabulous 19th Over Against New Zealand
Pakistan Pacer Haris Rauf Fabulous 19th Over Against New Zealand  esakal
क्रीडा

VIDEO : 19 वं षटक कसं टाकायचं ते हारिस रौऊफकडून शिकावं!

अनिरुद्ध संकपाळ

Haris Rauf 19th Over NZ vs PAK T20 : पाकिस्तानने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या ट्रायसिरीजमध्ये न्यूझीलंचा 6 विकेट्स राखून पराभव केला. आज (दि. 08) झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला पाकिस्तानने 147 धावात रोखले. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यासमोर न्यूझीलंडने 20 षटकात 8 बाद 147 धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने केलेल्या नाबाद 79 धावांच्या जोरावर पाकिस्तानने हे आव्हान 10 चेंडू राखून पार केले. जरी बाबरने दमदार खेळी केली असली तरी गोलंदाजीत वेगवान गोलंदाज हारिस रौऊफने टाकलेल्या 19 व्या षटकाचा देखील पाकिस्तानच्या विजयात तेवढाच वाटा आहे.

हारिस रौऊफने आपल्या 4 षटकांच्या कोट्यात 28 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे हारिस आपले वैयक्तिक चौथ्या आणि संघाच्या 19 व्या षटकात 3 विकेट्स घेतल्या.

हारिस रौऊफ 19 वे षटक टाकण्यासाठी आला त्यावेळी न्यूझीलंडच्या 4 बाद 137 धावा झाल्या होत्या. न्यूझीलंड शेवटच्या दोन षटकात जास्तीजास्त धावा करून पाकिस्तानसमोर मोठे टार्गेट सेट करण्याच्या तयारीत होता. न्यूझीलंडच्या हातात विकेट्स देखील होत्या. मात्र हारिस रौऊफने 19 व्या षटकात 3 विकेट्स घेत त्यांच्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरले. न्यूझीलंडला त्या अखेरच्या 12 चेंडूत फक्त 10 धावाच करता आल्या.

हारिस रौऊफने 19 व्या षटकात जेम्स नीशम, मायकल ब्रेसेवेल आणि मार्क कॅम्पमन यांची शिकार केली. हारिस रौऊफने टाकलेल्या 19 व्या षटकात फक्त 5 धावाच दिल्या. हारिस रौऊफ बरोबरच मोहम्मद वासिमने देखील चांगला मारा करत 4 षटकात 20 धावात 2 विकेट्स घेतल्या. मोहम्मद नवाझने देखील दोन विकेट्स घेतल्या मात्र त्याने 11 धावा प्रतीषटक च्या सरासरीने धावा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT