Pakistan Pacer Shaheen Afridi has been ruled out For Asia Cup 2022 esakal
क्रीडा

Asia Cup 2022 : भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का | Shaheen Afridi

अनिरुद्ध संकपाळ

Shaheen Afridi : पाकिस्तानला आशिया कपमधील भारत पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. त्यांचा आघाडीचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया कपला मुकला आहे. गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये शाहीन शाह आफ्रिदीने भारताची टॉप ऑर्डर उडवली होती. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली सारखे भारताचे अव्वल फलंदाज माघारी धाडून भारताला बॅकफूटवर ढकलले होते. मात्र तो आता आशिया कपला मुकणार असल्याने हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Pakistan Pacer Shaheen Afridi has been ruled out For Asia Cup 2022)

शाहीन आफ्रिदी आशिया कप बरोबरच मायदेशात होणाऱ्या इंग्लंड विरूद्धच्या मालिकेला देखील मुकण्याची शक्यता आहे. तो न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेपूर्वी दुखापतीतून सावरण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळेल. गेल्या महिन्यात श्रीलंकेविरूद्धच्या गाले कसोटीत शाहीन आफ्रिदीचा उजव्या गुडघ्यामधील लिगामेंट दुखावला होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची वैद्यकीय सल्लागार समिती आणि एक्पर्ट डॉक्टरांनी त्याला 4 ते 6 आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे शाहीन आफ्रीदी दोन मोठ्या स्पर्धांना मुकणार आहे. पीसीबी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नजीबुल्ला सूमरो यांनी सांगितले की, 'मी शाहीनशी बोललो आहे. तो आशिया कपला मुकणार म्हटल्यावर खूप नाराज झाला आहे. ते स्वाभाविक आहे. मात्र आफ्रिदी एक धाडसी युवा खेळाडू आहे. तो या दुखापतीवर यशस्वीरित्या मात करून पुन्हा एकदा देशाची सेवा करण्यास सज्ज होईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT