Pakistan Prime Minister Shehbaz Sharif Responds Zimbabwe President Tweet T20 World Cup 2022 esakal
क्रीडा

PAK vs ZIM : जय - पराजयानंतर झिम्बाब्वेचे अध्यक्ष अन् पाकचे पीएम यांच्यात रंगले 'ट्विटवर वॉर'

अनिरुद्ध संकपाळ

Zimbabwe Defeat Pakistan Political Reaction : पात्रता फेरी खेळून सुपर 12 फेरीत दाखल झालेल्या झिम्बाब्वेने ग्रुप 2 मधील बालढ्य समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा 1 धावेने पराभव केला. या पराभवाचे पडसाद संपूर्ण क्रिकेट वर्तुळात उमटले. झिम्बाब्वेच्या या झुंजार विजयाची दखल फक्त दिग्गज क्रिकेटपटूंनी नाही तर देशाच्या प्रमुखांनी देखील घेतली. झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनी सामन्यानंतर ट्विटवर ट्रेंड होत असलेल्या खोट्या मिस्टर बीनवरून खोचक ट्विट केले होते. त्याला आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

टी 20 वर्ल्डकप सुपर 12 मध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एक धावेने पराभव केल्यानंतर झिम्बाब्वेचे अध्यक्ष इमेर्सन दामबुदझो (Emmerson Dambudzo) यांनी संघाचे अभिनंदन करणारे ट्विट केले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'झिम्बाब्वेचा दमदार विजय, अभिनंदन चेव्हरॉन्स. पुढच्या वेळी खरा मिस्टर बीन पाठवा...' झिम्बाब्वेच्या अध्यक्षांनीच पाकिस्तानला खोटा मिस्टर बीन पाठवल्याप्रकरणी चिमटा काढल्यामुळे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले होते. या ट्विटने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच नाचक्की होत आहे.

दरम्यान, झिम्बाब्वेच्या अध्यक्षांच्या या ट्विटला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रत्युत्तर दिले. मात्र हे प्रत्युतर कमी आणि खोट्या मिस्टर बीनवरून नाचक्की झाल्यानंतरची सारवासारव जास्त होती. पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'आमच्याकडे खरा मिस्टर बीन नसेलही मात्र आमच्याकडे खरे क्रिकेटिंग स्पिरीट आहे. आम्हा पाकिस्तानींची एक सवय आहे आम्ही जोरदार बाऊन्स बॅक करतो. अध्यक्ष महोदय तुमचा संघ आज जिंकला त्याबद्दल तुमचे अभिनंदन.'

खरंतर या सगळ्याची सुरुवातीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ट्विटने होते. मंगळवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एक ट्विट केले. यामध्ये झिम्बाब्वेसोबतच्या सामन्यापूर्वी संघाच्या सराव सत्रातील काही छायाचित्रे शेअर केली होती. या ट्विटला उत्तर देताना Ngugi Chasura नावाच्या एका ट्विटर यूजरने लिहिले की, 'झिम्बाब्वेचे नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. एकदा तुम्ही खऱ्या मिस्टर बीन ऐवजी बनावट पाक बीन दाखवला होता. याबद्दल उद्या मैदानावर पाहूण घेऊ. उद्या पाऊस तुम्हाला वाचवेल अशी प्रार्थना करा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT