pakistan squad fakhar zaman replaces usman qadir t20 world cup 2022 sakal
क्रीडा

T20 World Cup : भारताचं बघून पाकिस्ताननेही संघात केला बदल; अनुभवी फलंदाजाला केले पाचारण

टीम इंडियाचा दुश्मन पाकिस्तान संघात परतला!

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 Pakistan Squad Fakhar Zaman : बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ आता सध्या चांगली कामगिरी करत आहे. न्यूझीलंडला हरवून पाकिस्तानने तिरंगी मालिका जिंकली. आता टी-20 विश्वचषक 2022 साठी पाकिस्तान संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) लेगस्पिनर उस्मान कादिरला वगळले आणि त्याच्या जागी अनुभवी फलंदाज फखर झमानचा समावेश केला. पीसीबीने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शुक्रवारी स्टार फलंदाज फखर जमानचा टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघात समावेश केल्याचे जाहीर केले. पीसीबीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कादिरला 25 सप्टेंबर रोजी कराची येथे इंग्लंड विरुद्धच्या T20I दरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. उस्मान कादिर 22 ऑक्टोबरपूर्वी निवडीसाठी उपलब्ध नसल्यामुळे पीसीबीला त्याला संघातून वगळावे लागले.

फखर जमान पहिला राखीव खेळाडू म्हणून संघात होता. शनिवारी लंडनहून ब्रिस्बेनला येणार असून त्याच्यासोबत गुडघ्याच्या दुखापतीमुळे पुनर्वसन सुरू असलेला वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी सोबत आहे. ही जोडी पाकिस्तानच्या इंग्लंड (17 ऑक्टोबर) आणि अफगाणिस्तान (19 ऑक्टोबर) विरुद्धच्या सराव सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध असणार आहे, ज्या दरम्यान संघ व्यवस्थापन गुडघ्याच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर फलंदाज फखर जमानच्या फिटनेसचे मूल्यांकन करेल.

T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ :

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT