Pakistan Super League 2023 Security cameras cable and batteries worth Rs 10 lakh stolen from Lahore's Stadium cricket news in marathi kgm00 
क्रीडा

PSL : पाकिस्तान सुपर लीगमध्ये पुन्हा गदारोळ! स्टेडियममधून CCTV कॅमेरे अन् 10 लाखांचा माल चोरीला

Kiran Mahanavar

Pakistan Super League 2023 : पाकिस्तान सुपर लीगचा हा सीझन ब्लॉकबस्टर दिसत आहे. मैदानावर चौकार-षटकारांच्या पावसासोबतच खेळाडूंचे वर्तनही चर्चेत आहे. कधी फलंदाज जोडीदारावर बॅट घेऊन धावतोय तर कधी लाईव्ह कॅमेऱ्यात कुणीतरी जोडीदाराचा गाल ओढून पळत आहे. तोपर्यंत ठीक होते. आता तर स्टेडियममध्ये बसवलेले सिक्युरिटी कॅमेरे, केबल्स, जनरेटरच्या बॅटऱ्याही चोरीला गेल्या आहेत. लाहोरमधील ऐतिहासिक गद्दाफी स्टेडियममध्ये ही घटना घडली. या सर्वांची किंमत 10 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तान सुपर लीगमधील सामने आता लाहोरमध्येही खेळल्या जाणार आहेत. याआधी कराची आणि मुलतानमध्ये सामने झाले आहेत. कराचीमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. आता लीग टप्प्यातील 20व्या सामन्यापर्यंत पीएसएलचे सामने कराची आणि लाहोरमध्ये खेळवले जातील. कराचीने पीएसएलचे अनेक सामने आयोजित केले आहेत. पण या मोसमातील पहिला सामना रविवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. या अगोदरही स्टेडियममधील 10 लाखांचा सुरक्षा कॅमेरा, केबल आणि बॅटरी चोरीला गेली होती.

पीएसएलच्या या टप्प्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर 4 सामने खेळल्या जाणार आहेत. यानंतर क्वालिफायर, एलिमिनेटर आणि अंतिम दोन्ही सामने लाहोरमध्येच खेळले जातील.

चोरीची ही घटना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमबाहेर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये चोर सामान घेऊन पळताना दिसत आहेत. यानंतर गुलबर्ग पोलिस ठाण्यात 2 वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : टीम इंडियाला धक्का! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघातून बाहेर, 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा...

Rabies Death in Kolhapur : जयसिंगपुरात ५ जणांना चावलं पिसाळलेलं कुत्र, एका महिलेचा रेबीजने मृत्यू; ७ वर्षांच्या मुलीवरही हल्ला

Latest Marathi News Live Update : २००२ च्या तरतुदींनुसार अंदाजे १०८ कोटी रुपये किमतीचा १.३५ एकरचा व्यावसायिक भूखंड तात्पुरता जप्त केला आहे- ईडी

Malegaon Protest : मोठी बातमी ! मालेगाव अत्याचार प्रकरणी जनआक्रोश मोर्चाला हिंसक वळण, आक्रमक आंदोलक गेट तोडून कोर्टात घुसले

Donald Trump: साडेतीनशे टक्के शुल्क लावणार होतो; ट्रम्प यांच्याकडून संघर्ष थांबविल्याचा पुनरुच्चार

SCROLL FOR NEXT