pakistan team t20 world cup 2022 new jersey sakal
क्रीडा

Pakistan Jersey : बाबर आझम चट्ट्यापट्ट्यात; पाकिस्तानची नवी जर्सी फुल्ल टू कॉमेडी

पाकिस्तानची नवी जर्सी कॉमेडी, बाबर आझमचा फोटोंनं हसू आवरणार नाही

Kiran Mahanavar

Pakistan T20 World Cup Jersey : ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यापासून टी-20 वर्ल्ड कप 2022 ला सुरूवात होणार आहे. अनेक संघांनी वर्ल्डकपसाठी आपली नवीन जर्सीही लाँच केली आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने नुकतीच टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच केली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या जर्सीचा लुक समोर आली आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा नव्या जर्सीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय चाहत्यांनी पीसीबीच्या खराब जर्सी लुकमुळे ट्रोल करत आहे. मात्र पीसीबीकडून नवीन किटबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते त्याला टी-20 वर्ल्ड कप 2022 साठी पाकिस्तानची नवीन जर्सी सांगत आहेत. या जर्सीची टीम इंडियाच्या जर्सीशी तुलना करत भारतीय चाहत्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जोरदार ट्रोल केले आहे. या जर्सीवर चाहते अनेक मजेशीर कमेंट करत आहेत.

बीसीसीआयने रविवारीच आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह इतर स्टार खेळाडूंच्या उपस्थितीत टीम इंडियाची नवीन जर्सी लॉन्च करण्यात आली आहे. जी यावेळी आकाश निळ्या रंगाची आहे. भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्‍टोबरपासून टी-20 विश्‍वचषकात आपल्‍या मिशनची सुरूवात करणार आहे. 

टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघ -

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शान मसूद, उस्मान कादिर.

टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

स्टँडबाय खेळाडू- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT