Pakistan ICC World Cup 2023 sakal
क्रीडा

Pakistan WC 23 : वर्ल्ड कपमधील फ्लॉप शोनंतर पाकिस्तान क्रिकेटची मोठी कारवाई, परदेशी कोचची हकालपट्टी?

Kiran Mahanavar

Pakistan ICC World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मधील फ्लॉप शोनंतर पाकिस्तान क्रिकेटने कुठेतरी मोठी पाऊल उचलले दिसत आहे. वर्ल्ड कपधून बाहेर गेल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमधील सर्व परदेशी चेहरे बाहेर होण्याची शक्यता आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या वृत्तात असे म्हटले आहे.

या अहवालानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तातडीची बैठक बोलावणार आहे, त्यानंतर पाकिस्तान संघाच्या सर्व परदेशी प्रशिक्षकांना बडतर्फ केले जाऊ शकते.

पाकिस्तान संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये वरच्या पदांवर जास्त परदेशी चेहरे आहेत. टीम डायरेक्टर मिकी आर्थर आहे. ग्रँट ब्रॅडबर्न हे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि फलंदाजी प्रशिक्षकपद अँड्र्यू पुटिक यांच्याकडे आहे. दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल यांच्याकडे पाकिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपद होते, मात्र त्यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

वर्ल्ड कप 2023 मध्ये फ्लॉप शो

वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तान अपेक्षेप्रमाणे आपली कामगिरी करू शकला नाही. वर्ल्ड कपआधी या संघाला ट्रॉफी जिंकण्याच्या दावेदारांमध्ये गणली जात होती, परंतु संघाला अंतिम 4 मध्येही स्थान मिळवता आले नाही.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सलग दोन सामने जिंकून पाकिस्तान संघाने चांगली सुरुवात केली होती, पण त्यानंतरच्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, हा संघ शेवटपर्यंत उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहिला.

वर्ल्ड कपमध्ये स्टार खेळाडू फ्लॉप

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची या वर्ल्ड कपमध्ये बॅट शांत राहिली होती. गरजेच्या वेळी त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. सलामीवीर इमाम उल हक आणि संघाचा उपकर्णधार शादाब खान यांनीही पाकिस्तान संघाची निराशा केली. परिस्थिती अशी होती की संघ व्यवस्थापनाला शादाब आणि इमाम सारख्या स्टार खेळाडूंना प्लेइंग-11 मधून वगळावे लागले.

स्पेशालिस्ट स्पिनरची कमतरता

या वर्ल्ड कपमधील पाकिस्तानला एका चांगल्या फिरकी गोलंदाजाचीही उणीव भासली. भारताच्या फिरकीसाठी अनुकूल विकेटसाठी पाकिस्तान संघात चांगला फिरकीपटू नसणे हे त्याच्या बाहेर पडण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज हारिस रौफ चांगलाच महागडा ठरला. प्रत्येक सामन्यात त्याने भरपूर धावा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT