क्रीडा

Pak vs Aus: गजब बेइज्जती है... ऑस्ट्रेलिया विमानतळावर पाकिस्तानी खेळाडूंना स्वतः ट्रकमध्ये भरावं लागलं सामान अन्...

पाकिस्तानी संघ कसोटी मालिकेसाठी जेव्हा विमानतळावर पोहोचला तेव्हा त्यांच्या मदतीसाठी कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता त्यामुळे खेळाडूंना त्याचं सामान स्वत: ट्रकमध्ये भरावं लागलं.

Manoj Bhalerao

Pakistan Team Unloading Luggage: पाकिस्तान क्रिकेट संघ ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. नवा कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वाखालील संघाचे ऑस्ट्रेलियात अशा प्रकारे स्वागत होईल, ज्याची पाकिस्तानी खेळाडूंनी कल्पनाही केली नसेल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये पाकिस्तानी खेळाडू सिडनी विमानतळावर स्वतःचे सामान ट्रकमध्ये भरताना दिसत आहेत.

पाकिस्तानी खेळाडू (PAK vs AUS) लाहोरहून दुबईमार्गे सिडनीला पोहोचले आहेत. सामान्यत: विमानतळावर पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी असायला हवे होते, परंतु पाकिस्तानी दूतावासातील कोणताही अधिकारी किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणताही अधिकारी तेथे नव्हता. अशा परिस्थितीत पाकिस्तानी खेळाडू आणि अधिकाऱ्यांना त्यांचे सामान स्वतः उचलून ट्रकमध्ये चढवावे लागले.

मोहम्मद रिझवानने उचलली जबाबदारी

व्हिडिओमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा वरिष्ठ खेळाडू मोहम्मद रिझवान देखील ट्रकमध्ये उभा राहून इतर सहकाऱ्यांना मदत करताना दिसत आहे. रिझवान ट्रकमध्ये उभा राहून इतर खेळाडूंचे सामान उचलून ट्रकच्या आत ठेवतो. सहसा अशी परिस्थिती विमानतळावर खेळाडूंसोबत पाहायला मिळत नाही. एवढे सगळे करूनही रिजवानने चाहत्यांना नाराज केलं नाही आणि त्यांच्यासोबत सेल्फीसाठी पोज दिली.

पहिली कसोटी १४ डिसेंबरपासून

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना १४ डिसेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेत पाकिस्तानी संघ नवा कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. भारतात नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी खराब झाली होती. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ विश्वचषक स्पर्धेत 9 पैकी 4 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. विश्वचषकानंतर पाकिस्तानात परतल्यानंतर बाबरने कर्णधारपद सोडले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT