Sunil Chhetri 1st Goal IND vs PAK  esakal
क्रीडा

IND vs PAK : Video व्हायरल! पाकच्या गोलकिपरचा गचाळपणा पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Chhetri 1st Goal IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील SAFF Championship मधील सामन्यात सुनिल छेत्रीने 10 व्या मिनिटालाच गोल करत भारताचे खाते उघडले. मात्र हा गोल करण्यात छेत्रीला फार काही कष्ट करावे लागले नाहीत. त्याला पाकिस्तानच्या गोलकिपरने गचाळपणा करत गोल करण्याची ऐती संधी दिली.

सामन्याच्या 10 व्या मिनिटाला पाकिस्तानच्या डिफेंडरने बॉल गोलकिपरकडे पाठवला. यावेळी गोलकिपरने चेंडू आडवलेला पाहून सुनिल छेत्री त्याच्या दिशेने जोरात धावून गेला. त्यामुळे गोंधळलेल्या पाकिस्तानच्या गोलकिपरने बॉलवरील ताबा गमावला अन् चेंडू सुनिल छेत्रीला गोल करण्यासाठी रान मोकळं झालं. छेत्रीने बॉल गोलपोस्टमध्ये अलगद पोहचवत भारताचे गोलचे खाते उघडले.

पहिल्या गोलनंतर भारताने बॉल पाकिस्तानच्या गोलपोस्टजवळच ठेवला. भारतीय स्ट्रायकर्सनी सातत्याने पाकिस्तानच्या गोलपोस्टवर चढाया केल्या. सुनिल छेत्रीला 16 व्या मिनिटाला पेनाल्टी मारण्याची संधी मिळाली. ही संधी छेत्रीने वाया न घालवता भारतासाठी दुसरा गोल केला. अवघ्या 15 मिनिटात दोन गोल खाल्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर गेले.

भारतीय संघाने बॉलवरचा आपला ताबा कायम ठेवला. भारताने पहिल्या हाफमध्ये पाकिस्तानच्या गोलपोस्टवर 12 वेळा चढाया केल्या. यातील 4 शॉट्स ऑन टार्गेट होते. तर 74 टक्के बॉल भारताच्या ताब्यात होता. भारताने तब्बल 237 पासेस दिले. यात 87 टक्के अचुकता होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT