क्रीडा

Zainab Abbas:हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकार झैनाब अब्बासची भारतातून हकालपट्टी

Zainab Abbas Exiled: ९ वर्षांआधी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतविरोधी आणि हिंदु धर्माच्या विरोधात ट्वीट केल्यामुळे, झैनाबची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Manoj Bhalerao

सध्या भारतात एकदिवसीय विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी पाकिस्तान संघ आणि काही क्रीडा पत्रकारांना भारतात येण्याची परवानगी मिळाली. पाकिस्तानातील प्रसिद्ध क्रीडा पत्रकार झैनाब अब्बास हीला देखील आयसीसीच्या समालोचकांच्या गटात सामील करण्यात आलं होतं.

मात्र, ही महिला क्रीडा पत्रकार कायदेशीर अडचणींमध्ये सापडली आहे. आयसीसीच्या कमेंटेटर्स लिस्टमध्ये असलेल्या या पत्रकाराच्या सोशल मीडियाची पाहणी करण्यात आली. हिंदु देवि-देवतांवर आक्षेपार्ह टीका केल्याचं निष्पण्ण झालं, ज्यानंतर तिला तडकाफडकी भारत सोडावा लागला. सध्या ती दुबईमध्ये आहे. तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप तिनं फेटाळले आहेत. यावर आयसीसीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

झैनाबवर आरोप काय आहेत?

भारताच्या सुप्रीम कोर्टात कार्यरत असणाऱ्या वकील विनीत जिंदल यांनी झैनाब अब्बास विरोधात सायबर तक्रार नोंदवली होती.त्यानंतर ३५ वर्षीय या अँकरच्या अकाऊंटची पडताळणी करण्यात आली. या अकाऊंटवर अशा काही पोस्ट आढळल्या ज्यांना हिंदु विरोधी आणि भारतविरोधी मानल्या जातात. या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. वकील विनीत जिंदाल यांनी आरोप लावला की या पोस्ट जवळपास ९ वर्षांआधी करण्यात आल्या आहेत.

वकील विनीत जिंदाल यांनी झैनाबच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर याची प्रत सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम सेलने हिंदुविरोधी आणि भारतविरोधी वक्तव्याबद्दल तिच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. यावेळी विनीतने भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ, २९५, ५०६, १२१ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६७ अंतर्गत एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. (Latest Marathi news)

पाकिस्तानी मीडियामध्ये काय चालले आहे?

समा टीव्हीने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार, झैनाबने तिच्या बचावात असा युक्तिवाद केला आहे की हे ट्वीट अनेक वर्षे जुने आहेत आणि तिच्या विश्वचषक कॉमेंट्रीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तिला भारतात राहण्याची परवानगी मिळाली पाहिजे. सध्या झैनब अब्बास दुबईत आहे. झैनाब अब्बासने जेव्हा हे ट्वीट केले होते तेव्हा तिच्या ट्विटर अकाऊंटचं नाव 'zainblowsrk' असं होतं, ज्यानंतर तिने हे नाव 'जब्बास ऑफिशिअल' असं केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक

माेठी बातमी! 'ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनवर सरकारचा डल्ला': राष्ट्रीय संघर्ष समिताचा आरोप; ८० लाखांहून अधिक पेन्शनधारकांची रक्कम गेली कुठे?

वाहनधारकांनो, ‘दंड भरा नाहीतर कोर्टात हजर व्हा’! पोलिसांनी ‘या’ वाहनचालकांना दंड भरण्यासाठी बजावले वॉरंट अन्‌ समन्स; ‘सीसीटीव्ही’त बेशिस्त वाहनचालक कैद

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानासाठी शुक्रवारी विशेष कॅम्प; शाळांना अनुदानासाठी ‘या’ १७ कागदपत्रांचे बंधन; बायोमेट्रिक हजेरीला दिला पर्याय

Bribery Action: 'बोरगावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात'; काेरेगाव तालुक्यात खळबळ, हक्कसोडपत्र करताे म्हणाला अन्..

SCROLL FOR NEXT