Palash Muchhal Propose Smriti Mandhana In Live Concert sakal
क्रीडा

Smriti Mandhana : 'मी तुझ्यावर प्रेम...' स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंडने थेट LIVE कॉन्सर्टमध्ये केलं प्रपोज!रोमँटिक Video व्हायरल

Kiran Mahanavar

Palash Muchhal Propose Smriti Mandhana In Live Concert : भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि बॉलीवूडगायक पलाश मुच्छल यांच्या नात्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. मात्र, या जोडप्याने कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही सांगितले नाही.

पण, आता LIVE कॉन्सर्ट दरम्यान पलाशने सर्वांसमोर आपले मन मोकळे केले आणि स्मृती मानधना त्याची गर्लफ्रेंड असल्याचे जाहीर केले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील नात्याबद्दल सर्वांनाच माहिती होती, मात्र या जोडप्याने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नाही. पण, आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पलाश हजारो लोकांसमोर आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पलाशच्या लाइव्ह कॉन्सर्टचा आहे, ज्यामध्ये त्याची बहीणही एकत्र दिसत आहे. यावेळी त्यांनी मंचावर हजारो लोकांसमोर स्मृतींवरील प्रेम व्यक्त केले. व्हिडिओमध्ये पलाशने स्मृतीला त्याची गर्लफ्रेंड म्हणून सांगितले आणि तिच्यासाठी एक गाणे गायले.

क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक-गायक पलाश यांनी सोशल मीडियावर अनेकदा एकत्र फोटो शेअर केले आहेत. इतकेच नाही तर ते दोघेही नुकतेच इंग्लंडमध्ये होते आणि त्यांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले फोटोही त्याच पार्श्वभूमीचे होते, ज्यामुळे ते दोघे एकत्र सुट्टी घालवत असल्याचे स्पष्ट होते.

आता, जेव्हा पलाशने स्टेजवर आय लव्ह यू टू म्हंटले आहे, तेव्हा चाहत्यांचा अंदाज आहे की कदाचित स्मृतीने पलाशला आधी प्रपोज केले असेल, ज्याला त्याने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये उत्तर दिले आहे. बातम्यांवर विश्वास ठेवला तर हे दोघे 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT