महाराष्ट्राचा ॲथलीट सर्वेश कुशारे यंदा पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सर्वेश पुरुष विभागातील उंच उडी प्रकारात सर्वस्व पणाला लावताना दिसेल.  Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: प्रतिस्पर्ध्याची कीर्ती पाहू नकोस, सरावावर लक्ष दे! नीरजच्या सल्ल्याने आत्मविश्‍वास उंचावला-सर्वेश कुशारे

Neeraj chopra's Advice Boosted Self-Confidence - Sarvesh Kushare: महाराष्ट्राचा ॲथलीट सर्वेश कुशारे यंदा पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सर्वेश पुरुष विभागातील उंच उडी प्रकारात सर्वस्व पणाला लावताना दिसेल.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्राचा ॲथलीट सर्वेश कुशारे यंदा पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सर्वेश पुरुष विभागातील उंच उडी प्रकारात सर्वस्व पणाला लावताना दिसेल. ऑलिंपिक सुरू होण्याआधी मराठमोळ्या पट्ठ्याने टोकियोमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राचे कौतुक केले.

सर्वेश याने प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवाआधी आत्मविश्‍वास उंचावल्याचे मत व्यक्त केले. तो म्हणाला, प्रतिस्पर्ध्याची कीर्ती किती मोठी हे पाहून घाबरू नकोस. सरावावर अधिक लक्ष दे. असा सल्ला नीरज चोप्रा याने मला दिला. त्यामुळे माझा आत्मविश्‍वास कमालीचा उंचावला.

पोलंड येथे ऑलिंपिकचा सराव करीत असताना सर्वेश कुशारे याने आपले मत व्यक्त केले. दरम्यान, पॅरिस ऑलिंपिकसाठी २.३३ मीटर उंच उडीची पात्रता होती. सर्वेश कुशारे पॅरिससाठी पात्र ठरेल याची शाश्‍वतीही नव्हती.

जागतिक क्रमवारीतील कोट्यानुसार त्याला ऑलिंपिकसाठी पात्र ठरता आले. साध्या चटईवर सराव करणाऱ्या सर्वेश याने ऑलिंपिकमधील उंच उडी क्रीडा प्रकाराची पात्रता मिळवली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला हे विशेष. सर्वेश याप्रसंगी म्हणाला,

‘तो’ माझा आदर्श

महाराष्ट्रातील नाशिकजवळ वास्तव्य असलेल्या सर्वेश कुशारे याने नीरज चोप्राची स्तुती करताना म्हटले की, नीरज याने भालाफेकीत सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. ॲथलेटिक्समध्ये भारताला पदक मिळवून दिले. त्याच्यामुळे आमच्या आत्मविश्‍वासातही भर पडली. ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याचा विश्‍वास वाटू लागला. नीरज माझा आदर्श आहे.

अंतिम फेरीचे लक्ष्य

सर्वेश कुशारे याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. तो म्हणाला, ७ ऑगस्ट रोजी पात्रता फेरी होणार आहे. या फेरीत ठसा उमटवल्यास अंतिम फेरीत पोहोचेन. दरम्यान, सुरुवातीच्या दिवसांबाबत तो सांगतो की, आमच्या गावामध्ये उंच उडीकरिता लागणारे मॅट (चटई) नव्हते. साध्या चटईवर मी सराव करायचो.

मुलीचा चेहरा ऑलिंपिकनंतर बघणार

सर्वेश कुशारे याला नऊ महिन्यांपूर्वी कन्यारत्न झाले. यावर तो म्हणाला, नोव्हेंबरपासून मी माझ्या मुलीला पाहिले नाही. तिच्यासोबत फक्त पाच दिवस राहिलो. आता तिचा चेहरा थेट ऑलिंपिकनंतर पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT