Elavenil Valarivan  sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: पहिल्याच दिवशी भारताच्या नेमबाजांना पदक जिंकण्याची 'सुवर्ण'संधी! जाणून घ्या आजच्या दिवसाचं वेळापत्रक

Paris Olympic 2024 India Schedule on 27 July: शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकचे उद्घाटन पार पडल्यानंतर स्पर्धेला अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे. आता पहिल्या दिवशी भारताचं वेळापत्रक कसं असणार आहे, जाणून घ्या.

Pranali Kodre

Paris Olympic 27 July Schedule: शुक्रवारी सीन नदी तीरावर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. आता प्रत्येक देशाचा खेळाडू मेडल जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावताना दिसेल.

या स्पर्धेत भारताचे ११७ खेळाडू सहभागी होणार आहे. भारताचे खेळाडू १६ विविध क्रीडा प्रकारात सहभागी होताना दिसणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे भारताची मोहिम गुरुवारीच चालू झाली असून तिरंदाजीच्या क्वालिफायर्समध्ये भारतीय तिरंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.

दरम्यान, उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवारी (२७ जुलै) भारताचे अनेक खेळाडूंनी मैदानात उतरणार आहेत. नेमबाजी, हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, रोईंग, टेनिस अशा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू शनिवारी खेळताना दिसणार आहेत.

नेमबाजीत यंदा पहिल्यांदाच १५ प्रकारात भारताचे खेळाडू सहभागी आहेत. महत्त्वाचं म्हणजे शनिवारी नेमबाजीत पदक जिंकण्याचीही संधी असेल.

शनिवारी १० मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर पिस्तुल प्रकारातील क्वालिफायर्स होणारेत. त्याचबरोबर दुपारी २ वाजत १० मीटर एअर रायफल मिश्र संघाची पदकांसाठीही लढती होणार आहेत.

भारताच्या रमिता जिंदाल व अर्जून बाबुता आणि इलावेनिल वलारिवन व संदीप सिंग या दोन जोड्या या प्रकारात सहभागी आहेत. जर त्यांनी क्वालिफायर्समधून पुढच्या फेरीत प्रवेश केला. तर त्यांना पदक जिंकण्याचीही संधी असेल.

याशिवाय शनिवारी भारत आणि न्यूझीलंड संघात हॉकीचा सामना रात्री ९ वाजता होईल. बॅडमिंटनमध्येही सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीच्या जोडीवर नजर असणार आहे.

बॉक्सिंगमध्ये ५४ किलो वजनी गटात भारताच्या प्रीती पवारचा पहिला सामना होणार आहे. रोईंगमध्ये बलराज पन्वर सहभागी होईल. त्यामुळे भारतासाठी हा पहिलाच दिवस कसा ठरणार या कडे सर्वांचेच लक्ष असेल.

पहिल्या दिवसाचं वेळापत्रक

  • नेमबाजी -

    • १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक क्वालिफिकेशन (दुपारी १२.३० वाजता)

    • १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक (दुपारी २ वाजल्यापासून) (मेडलसाठी लढत)

    • पुरुष १० मीटर एअर पिस्तुल क्वालिफिकेशन (दुपारी २ वाजल्यापासून)

    • महिला १० मीटर एअर पिस्तुल क्वालिफिकेशन (दुपारी ४ वाजल्यापासून)

  • रोईंग - पुरुष स्कल्स हिट (दुपारी. १२.३० वाजता) (बलराज पन्वर)

  • टेनिस - पुरुष दुहेरी पहिली फेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून) (रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी)

  • टेबल टेनिस - पुरुष एकेरी (संध्या. ७.१५ वाजल्यापासून) (हरमीत देसाई)

  • बॅडमिंटन -

    • एकेरी (संध्या. ७.१० वाजल्यापासून)(लक्ष्य सेन)

    • दुहेरी (रात्री ८ वाजल्यापासून) (सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी)

    • महिला दुहेरी (रात्री.११.५० वाजल्यापासून) (तनिषा क्रास्तो आणि अश्विनी पोनप्पा)

  • हॉकी - भारत विरुद्ध न्यूझीलंड (रात्री. ९ वाजता)

  • बॉक्सिंग - प्रीती पवार (५४ किलो) [मध्यरात्री १२.०२ वाजल्यापासून (२८ जुलै)]

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HBA Scheme: तुम्ही होम लोनचा हप्ता भरू शकत नाहीत? सरकारकडून मिळतेय 25 लाख रुपयांची मदत

Disqualification Bill: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना 30 दिवस तुरुंगवास झाल्यास पदमुक्त होणार! संसदेत मांडलं जाणार ऐतिहासिक विधेयक

Mobile Protection Tips: पावसाळ्यात मोबाईल भिजतोय? काळजी करू नका, हे उपाय करा!

Prithvi Shaw : मला कुणाची सहानुभूति नकोय... महाराष्ट्र संघाकडून शतक झळकावताच पृथ्वी शॉचा आजी-माजी खेळाडूंना टोमणा

Chiploon Karad Accident : चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पुण्याचे ५ जण ठार, रिक्षाचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT