Paris Olympic 2024  Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : नेमबाजांचा १२ वर्षांनंतर लक्ष्यवेध? २१ खेळाडूंच्या विक्रमी चमूकडून पदकांच्या आशा

पॅरिस ऑलिंपिकमधील नेमबाजी खेळाच्या स्पर्धेला आजपासून (ता. २७) सुरुवात होत असून यंदा भारताकडून २१ नेमबाज प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवासाठी पात्र ठरले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : पॅरिस ऑलिंपिकमधील नेमबाजी खेळाच्या स्पर्धेला आजपासून (ता. २७) सुरुवात होत असून यंदा भारताकडून २१ नेमबाज प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवासाठी पात्र ठरले आहेत. मागील दोन ऑलिंपिकमध्ये (रिओ दी जेनेरियो व टोकियो) नेमबाजीमध्ये भारताला एकही पदक जिंकता आलेले नाही. यंदा सर्वाधिक खेळाडू या खेळासाठी पात्र ठरल्यामुळे तब्बल १२ वर्षांनंतर भारताला या खेळामधून ऑलिंपिक पदक पटकावण्याची आशा करता येणार आहे.

ऑलिंपिकच्या इतिहासात भारताने नेमबाजी या खेळामधून चार पदके पटकावली आहेत. राज्यवर्धन राठोड (रौप्यपदक), अभिनव बिंद्रा (सुवर्णपदक), गगन नारंग (ब्राँझपदक) व विजयकुमार (रौप्यपदक) या भारतीयांनी अनुक्रमे अथेन्स, बीजिंग व लंडन ऑलिंपिकमध्ये पदके पटकावत भारतासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यानंतर पार पडलेल्या दोन ऑलिंपिकमध्ये भारताला नेमबाजी या खेळामधून एकही पदक पटकावता आलेले नाही.

पॅरिसमध्ये भारत पहिल्यांदाच नेमबाजीतील १५ प्रकारांमध्ये सहभागी होणार आहे. भारतीय नेमबाजांसाठी ही ऐतिहासिक बाब ठरली आहे. मनू भाकर, ऐश्‍वर्य प्रतापसिंग तोमर, अंजुम मौदगिल, एलावेनिल वालारिवन यांच्याकडून पदक जिंकण्याची आशा करता येईल.

अनिश भानवाला, सरबज्योत सिंग, अर्जुन बाबुता, अर्जुन सिंग चीमा व विजयवीर सिंग हे पुरुष नेमबाज पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे हादेखील पदकासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे. महिला विभागात सिफ्त कौर सामरा हिच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT