Parthiv Patel says Jasprit Bumrahs early phase doubtful talking about his bowling in Gujarat  esakal
क्रीडा

गुजरातमध्ये बुमराहच्या गोलंदाजीबद्दल चांगले बोलत नव्हते; पार्थिवचा खुलासा

अनिरुद्ध संकपाळ

जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाच्या वेगवान गोलंदाजांमध्ये गणना होते. मात्र जसप्रीत बुमराहच्या विचित्र बॉलिंग अॅक्शन (Bowling Action) आणि क्षमतेबद्दल कारकिर्दिच्या सुरूवातीला गुजरातमध्ये (Gujarat) फार काही चांगले बोलले जात नव्हते. ही माहिती बुमराह पहिल्यांदा ज्याच्या नेतृत्वात खेळला त्या पार्थिव पटेलने (Parthiv Patel) दिली आहे. पार्थिव पटेलने सांगितले की सुरूवातीच्या काळात जसप्रीत बुमराहच्या भात्यात फार काही अस्त्रे नव्हती.

जसप्रीत बुमराह सध्या भारतीय टी 20 आणि कसोटी संघाचा उपकर्णधार (Test Team Vice Captain) आहे. त्याच्याकडे भविष्यातील भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. याबाबत पार्थिव पटेल म्हणाला की ही अभिमानाची गोष्ट आहे. पार्थिवने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जसप्रीत बुमराह कसा घडला याबाबत माहिती दिली.

पार्थिव पटेल म्हणाला की, 'भारतातील अनेक लोक सुरूवातीच्या काळात जसप्रीत बुमराहच्या बॉलिंग अॅक्शनबाबत बोलत होते. या अॅक्शनमुळे तो कसा लगेचच दुखापतग्रस्त (Injury) होऊ शकतो असे गुजरातमध्ये बोलले जात होते. याचबरोबर तो फक्त वेगात टाकतो आणि फलंदाजाला बिट करतो. त्याला फलंदाजाची विकेट घेता येत नाही. मात्र तो कसा खेळतो हे जोपर्यंत तो रणजी ट्रॉफीत (Ranji Trophy) खेळला नाही तोपर्यंत त्याबाबत साशंकता होती.'

पार्थिव पटेल म्हणाला की जसप्रीत बुमराहने रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असताना आपल्या गोलंदाजीत कमालीची सुधारणा केली. त्याने मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळत असताना लसिथ मलिंगाबरोबर (Lasith Malinga) काम केले. पार्थिव पुढे म्हणाला, 'सुरूवातीच्या काळात त्याच्या गोलंदाजीत वैविध्य नव्हते. तो फक्त क्रीजच्या कोपऱ्यातून येणारा इनस्विंग बॉल आणि यॉर्कर टाकत होता. त्यानंतर तो क्रीजचा वापर कसा करायचा हे शिकला. त्याने आऊट स्विंग बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला. त्याची गोलंदाजीची शैली पाहते ते सोपे नव्हते. त्याने याच्यावर मलिंगासोबत काम केले. त्याने आपल्या भात्यात अस्त्रे वाढवलीत. नवीन चेंडूवर यॉर्कर टाकण्याची क्षमता त्याने विकसित केली.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT