AUS vs RSA 3rd Test Usman Khawaja Pat Cummins esakal
क्रीडा

AUS vs RSA :पॅट कमिन्सने राहुल द्रविडचा कित्ता गिरवला; उस्मान ख्वाजाला 5 धावांची गरज होती मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

AUS vs RSA 3rd Test Usman Khawaja : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकाला फॉलो ऑन दिला होता. मात्र दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने 2 बाद 106 धावा करत सामना अनिर्णित राखला. ऑस्ट्रेलियाने मालिका 2 - 0 अशी जिंकली. मात्र सिडनी कसोटीत एक वाद निर्माण झाला.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत आपल्या पहिला पहिला डाव 4 बाद 475 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून दोन शतके ठोकली गेली. स्टीव्ह स्मिथने 104 धावा केल्या तर सलामीवीर उस्मान ख्वाजाने 195 धावा केल्या. मात्र स्मीथ 104 धावा करून बाद झाला होता तर उस्मान ख्वाजा हा पहिला डाव घोषित केला त्यावेळी 195 धावांवर खेळत होता.

उस्मान ख्वाजा आपल्या द्विशतकापासून फक्त 5 धावा दूर होती. तरी देखील ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने डाव घोषित केल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेही ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तसाही फार काही धोका नव्हता. मात्र तरी देखील कमिन्सने डाव घोषित करत उस्मान ख्वाजाला द्विशतकापासून वंचित ठेवले. (Sports Latest News)

असाच प्रकार भारताचा माजी कर्णधार आणि सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडने सचिन तेंडुलकरच्या बाबतीत केला होता. द्रविडने 2004 च्या पाकिस्तान दौऱ्यावर मुल्तान कसोटीत सचिन तेंडुलकर आपल्या द्विशतकापासून फक्त 6 धावा दूर असताना डाव घोषित केला होता. त्यावेळी राहुल द्रविडवर देखील जोरदार टीका झाली होती.

ऑस्ट्रेलियाच्या 475 धावांच्या प्रत्युत्तरा खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 255 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला फॉलोऑन देत दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. आफ्रिकेने पाचव्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी 2 बाद 106 धावा केल्या. सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिका 2 - 0 जिंकली.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT