Pat Cummins Virat Kohli Wicket esakal
क्रीडा

Pat Cummins Virat Kohli Wicket : कोहलीची विकेट अन्... मृत्यू शय्येवर देखील पॅट कमिन्सला विराटच आठवणार

अनिरुद्ध संकपाळ

Pat Cummins Virat Kohli Wicket Deathbed Moment : 19 नोव्हेंबर 2023 रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. कांगारूंनी अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये भारताचा दोन फायनलमध्ये पराभव केला.

आयसीसी वर्ल्डकप टेस्ट चॅम्पियशिप अन् वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या पॅट कमिन्सला पत्रकारांनी तू मृत्यू शय्येवर असताना कोणत्या क्षणांना उजाळा देणार असा प्रश्न विचारला होता.

यावर पॅट कमिन्सने (Pat Cummins) वनडे वर्ल्डकप फायनलमधील विराट कोहलीची विकेट घेतली त्या क्षणाचा उल्लेख केला. कमिन्स म्हणाला, 'मला वाटते की विराट कोहलीची विकेट घेतल्यानंतर मला खूप आनंद झाला होता.'

'स्टीव्ह स्मिथ सांगत होता की, मित्रांनो एक सेकंद स्टेडियममधील आवाज ऐका. आम्ही त्या क्षणाचा आनंद घेतला. तेथे ग्रंथालयासारखी शांतता होती. तेथे एक लाख प्रेक्षक होते तरी तेथे भयंकर शांतता होती. मी या क्षणाचा दीर्घ काळ आनंद घेणार आहे.'

पॅट कमिन्सने फायनलमध्ये 34 धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. यातील एक विकेट ही विराट कोहलीची होती. भारताची अवस्था 3 बाद 81 धावा अशी झाली होती. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी मधल्या फळीत संथ फलंदाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

अर्धशतक पूर्ण करून देखील दोन्ही फलंदाज बचावात्मकच खेळत होते. ज्यावेळी विराट धावगती वाढवण्याच्या तयारीत होता त्याचवेळी कमिन्सने विरटचा स्लो कटर चेंडूवर त्रिफळा उडवला.

भारताचा डाव 240 धावात संपुष्टात आला. भारताने देखील कांगारूंची अवस्था 3 बाद 47 अशी केली होती. मात्र ट्रॅविस हेडने शतकी खेळी करत भारताच्या हातून सामना हिसकावून घेतला. दुसऱ्या डावात मैदानावर दव पडल्याने खेळपट्टी फलंदाजीला चांगली झाली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT