Pat Cummins named as Australia's new ODI captain 
क्रीडा

Pat Cummins : T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर ऑस्ट्रेलियन टीममध्ये खांदेपालट

डेव्हिड वॉर्नरही होता रेस मध्ये मात्र...

Kiran Mahanavar

Pat Cummins ODI Captain : टी-20 विश्वचषक 2022 हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल केला आहे. मात्र हा बदल वनडे फॉरमॅटसाठी करण्यात आला आहे. स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे ऑस्ट्रेलियन वनडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. कर्णधारपदासोबतच एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची जबाबदारीही पॅट कमिन्सच्या खांद्यावर असेल. पॅट कमिन्स आधीच ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळत आहेत.

मायदेशात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियन संघाला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. ही होम सीरिज असणार आहे. या मालिकेतून 29 वर्षीय पॅट कमिन्स वनडे फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाचा पदार्पण करणार आहे. तर टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये ऍरॉन फिंच ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. याआधी ऑस्ट्रेलियन वनडे संघाचे कर्णधारपदही आरोन फिंच सांभाळत होते. गेल्या महिन्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

फिंचच्या निवृत्तीनंतर चाहत्यांना वाटत होत की, स्टीव्ह स्मिथ किंवा डेव्हिड वॉर्नर यांच्याकडे कर्णधारपद दिले जाऊ शकते. पण हे होऊ शकले नाही. त्याच्या कर्णधारपदावरील आजीवन बंदी अजूनही लागू असल्याने तो कर्णधारपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहेत. जर त्याला कर्णधारपद सोपवण्यासाठी नियमांमध्ये बरेच बदल करावे लागले असते. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली म्हणाले, पॅट कमिन्सने कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

SCROLL FOR NEXT