pat cummins played oval test with suspected broken wrist could miss india series sakal
क्रीडा

Pat Cummins : पॅट कमिंस भारत दौऱ्यास मुकण्याची शक्यता

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार

सकाळ वृत्तसेवा

सिडनी : अॅशेस मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात मनगटाचे हाड मोडलेले असतानाही खेळणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यास मुकण्याची शक्यता आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिंसच्या दुखापतीची ही माहिती अधिकृतपणे उघड केलेली नाही. पुढील महिन्यातील भारत दौऱ्याची सुरुवात २२ सप्टेंबरपासून होत असून पहिला सामना मोहालीत होणार आहे.

पाचव्या अॅशेस कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी कमिंसच्या मनगटाचे हाड दुखावले होते. मनगटावर तो बँडेज लावून पूर्ण सामन्यात खेळला होता. फलंदाजी करताना त्याला त्रास होत असल्याचे दिसून येत होते.

भारत दौरा आणि त्याअगोदर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजून संघ जाहीर केलेला नाही. कमिंस खेळू शकला नाही तर मिशेल मार्श कर्णधार असण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या भारत दौऱ्यात कमिंसच्या अनुपस्थितीत स्टीव स्मिथने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Latest Marathi News Update LIVE: पुण्यात सलग तीन दिवस १० अंशांखाली तापमान

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

Pune Election 2025 : निवडणुकीच्या रिंगणातून माघार! पहिल्या दिवशी लोणावळ्यात नगराध्यक्ष, तर जिल्ह्यातून १४ सदस्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

SCROLL FOR NEXT