Pro Kabaddi sakal
क्रीडा

Pro Kabaddi : पाटणा, हरियाना उपांत्य फेरीत

दोलायमान स्थितीत असलेल्या सामन्यात पाटणा संघाने दिल्ली संघाचा ३७-३५ असा निसटता पराभव करून प्रो कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : दोलायमान स्थितीत असलेल्या सामन्यात पाटणा संघाने दिल्ली संघाचा ३७-३५ असा निसटता पराभव करून प्रो कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर आज झालेल्या दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात हरियाणाने गुजरात संघाचे आव्हान ४२-२५ असे संपुष्टात आणले.

यंदाच्या प्रो कबड्डी स्पर्धेत चढाईचे सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या आशू मलिकमुळे दिल्लीला विजयाची संधी मिळत होती. त्याने सर्वाधिक १९ गुणांची कमाईही केली होती; परंतु अंतिम क्षणी दिल्ली संघावर लोण पडला आणि अखेरच्या चढाईत बरोबरी साधण्याचीही संधी त्यांनी गमावली.

सुरुवातीला पाटणाने १४-७ अशी आघाडी घेत शानदार वाटचाल केली होती; परंतु आशूने सामन्याला कलाटणी मिळेल, असा पल्लेदार खेळ केला. पाटणाकडून सचिन तन्वर आणि सुधाकर यांनी चढाईचा शानदार खेळ केला.

आजच्या दुसऱ्या सामन्यात हरियाणाने गुजरातला प्रतिकार करण्याची संधी दिली नाही. हरियाणाच्या या विजयात विनय, मोहित नंदलाल, शिवम पाठारे यांचा खेळ निर्णायक ठरला. तर गुजरातचा कर्णधार आणि अनुभवी खेळाडू फझल अत्राचली पकडींमध्ये निष्प्रभ ठरला.

उपांत्य फेरीचे सामने (२९ फेब्रुवारी)

पुणे विरुद्ध पाटणा. जयपूर विरुद्ध हरियाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Amboli Tourist Accident : मुसळधार पाऊस अन् दाट धुक्यात धाडसी मोहीम! सह्याद्री रेस्क्यू टीमने 400 फूट खोल दरीतून बाहेर काढला निपाणीतील डॉक्टराचा मृतदेह

Marathi News Live Updates : तारळी धरणातून आज दुपारी २ वाजल्यापासून ९४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

370 रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेचं कमबॅक; पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

SCROLL FOR NEXT