CB Chairmen Ramiz Raja
CB Chairmen Ramiz Raja  ESAKAL
क्रीडा

Asia Cup 2022 : रमीझ राजा रोहित - बाबरची तुलना करत म्हणाले, भारत हरला कारण...

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 : आशिया कपची फायनल श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवली जात आहे. सर्वांना आशा होती की ही फायलन भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल. मात्र सुपर 4 मध्ये भारताने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून पाठोपाठच्या सामन्यात पराभव स्विकारला त्यामुळे भारताचे आव्हान सुपर 4 मध्येच संपुष्टात आले. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन रमीझ राजा भारताच्या पराभवाबाबत वक्तव्य करून चर्चेत आले आहेत. (PCB Chairmen Ramiz Raja Statement About India Defeat In Asia Cup and Captain Rohit Sharma)

रमीझ राजा पाकिस्तान - श्रीलंका ही आशिया कपची फायनल पाहण्यासाठी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आले आहेत. दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताच्या पराभवाबाबत देखील वक्तव्य केले. राजा म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट खेळत नाही. तरी देखील या दोन संघाची तुलना केली जाते. भारताला आशिया कपमध्ये पराभव सहन करावा लागला कारण ते संपूर्ण आशिया कपमध्ये प्रयोगच करत होते.

दुसरीकडे पाकिस्तान मैदानावर जिंकण्याच्या इराद्याने उतरत होती. त्यांनी आपले विजयाचे मॉडेल बदलले नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे संघ निवडीसाठी इतके पर्याय उपलब्ध आहेत की त्यांना आपले बेस्ट 11 निवडण्यासाठी सर्व खेळाडूंना चाचपून पाहिले. इथंच टीम इंडियाने मात खालली. भारताने प्रत्येक सामन्यात प्रयोग केले त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. दुसरीकडे बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आणि अंतिम फेरीत स्थान मिळवले. पाकिस्तान फायनल जिंकण्याचा प्रबळ दावेदार म्हणून गणला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT