Asia Cup 2022  
क्रीडा

Asia Cup 2022 : भारत पाकिस्तानमध्ये जाणार? PAK चा अंतिम निर्णय काय, विश्वचषकावरून देखील गदारोळ

Sandip Kapde

Asia Cup 2022 : आशिया चषक २०२३ च्या आयोजनाच्या ठिकाणावरून पाकिस्तानमध्ये जोरदार वाद सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता अंतिम फॉर्म्युला तयार केला आहे. पीसीबीने हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव एसीसीकडे पाठवला आहे. या अंतर्गत आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. मात्र उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये होतील.

मात्र हा प्रस्ताव एसीसीकडे पाठवल्यानंतर नजम सेठी यांनी मीडियासमोर खळबळजनक विधान केले आहे.एकदिवसीय विश्वचषक २०२३ बाबत मोठी खळबळ उडाली आहे.

पीसीबीने काल (शुक्रवार) आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाचा प्रस्ताव एसीसीकडे पाठवला असून भारताने सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करण्यास सहमती दर्शवली आहे. पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

भारत आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळू शकतो तर उर्वरित संघ पाकिस्तानमध्ये खेळतील. बीसीसीआयने दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता आणि स्पर्धा तटस्थ ठिकाणी घेण्याची मागणी केली होती.

आशिया कप २ ते १७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. ज्यामध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. स्थळाच्या वादामुळे सामन्यांचे नेमके वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश यांच्यासह पात्रता संघ सहभागी होणार आहेत.

तसेच पाकिस्तानने भारतासोबत समान अटींवरच क्रिकेट खेळावे, असे आपल्या देशातील लोकांचे मत असल्याचेही नजम सेठी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, भारताविरुद्ध खेळण्यासाठी आमच्या सरकारचे कोणतेही बंधन नाही. पण आम्हाला कोणती गरज देखील नाही. आम्ही आर्थिकदृष्ट्या आमच्या पायावर उभे राहू शकतो. आम्हाला भारतासोबत सन्मानजनक क्रिकेट खेळायचे आहे. आमची एसीसीशीही चर्चा सुरू आहे.

पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतल्यास, या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकादरम्यान शेजारील देशानेही हेच 'हायब्रीड मॉडेल' लागू केले पाहिजे. हा 'हायब्रीड' प्रयोग विश्वचषकादरम्यानही राबवता येईल, असे आम्हाला वाटते, असे देखील सेठी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT