Pele Health Update  esakal
क्रीडा

Pele Health Update : महान फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती ढासळली; मुलीने दिली माहिती

अनिरुद्ध संकपाळ

Pele Health Update : ब्राझीलचे महान फुटबॉलटू पेले यांची प्रकृती पुन्हा एकदा ढासळली असून त्यांना बुधवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती त्यांच्या मुलीने दिली. पेले ख्रिसमसमध्ये रूग्णालयातच राहणार आहेत. पेलेंच्या प्रकृतीबाबत अलबर्ट आईन्स्टाईन रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की 82 वर्षांचे फुटबॉलपटू पेले यांची किडनी आणि ह्रदय सुरळीत काम करत नाहीये. त्यामुळे त्यांना एलिव्हेटेड केअर मध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी पेलेंच्या श्वसन मार्गातील इन्फेक्शनबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर श्वसनाचा आजार बळावला होता.

दरम्यान, पेलेंच्या मुलीने सांगितले की, 'आम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत करून असे ठरवले आहे की त्यांना काही दिवस रूग्णालयातच ठेवणे योग्य राहील. आमचे नवे कुटुंब आईन्स्टाईन रूग्णालाय त्यांची चांगली काळजी घेत आहे. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि पेलेंच्या आरोग्याविषयीची माहिती आम्ही पुढच्या आठवड्यात देऊ.'

पेले यांनी ब्राझीलला 1958, 1962 आणि 1970 च्या फिफा वर्ल्डकपमध्ये विजय मिळवून दिला होता. देशाकडून खेळताना त्यांनी 77 गोल मारले होते. त्यांचे हे रेकॉर्ड यंदाच्या वर्ल्डकपमध्ये देखील अबाधित राहिले. कतारमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये नेमारने त्यांच्या या रेकॉर्डशी बरोबरी साधली.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT