pkl
pkl SAKAL
क्रीडा

PKL Season 8 : प्रो कबड्डीचा मुहूर्त ठरला; पण...

सुशांत जाधव

भारतात अल्पावधित लोकप्रिय ठरलेली लोकप्रिय प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi) स्पर्धेच्या आठव्या हंगामाचा मुहूर्त ठरला आहे. 22 डिसेंबर पासून यु मुम्बा आणि बंगळुरु बुल्स यांच्यातील लढतीने या स्पर्धेला सुरुवात होईल. आयोजकांनी बुधवारी यासंदर्भातील घोषणा केलीये. सुरुवातीच्या चार दिवसात प्रत्येक दिवशी तीन सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी यु मुम्बा आणि बंगळुरु बुल्स या लढतीशिवाय तेलगु टायटन्स विरुद्ध तमिळ थलायवाज आणि युपी योद्धा विरुद्ध गतविजेते बंगाल वॉरियर्स यांच्यात रंगत पाहायला मिळेल.

यंदाच्या हंगामातील स्पर्धा रंगणार हे पक्के ठरले असले तरी कोरोनामुळे सर्व सामने बंगळुरुमध्येच खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोडही होणार आहे. संपूर्ण स्पर्धेसाठी खेळाडू वास्तव्यास असलेल्या ठिकाणासह बंगळुरुच्या ज्या मैदानात सामने रंगणार आहेत त्याठिकाणी बायोबबलचे वातावरण तयार करण्यात आले आहे.

PKL हंगामात पहिल्यांदाच ट्रिपल हेडर्सच्या लढती रंगणार आहेत. देशभरातील कबड्डी चाहत्यांना सुरुवातीपासूनच आपल्या आवडत्या खेळाडूला पाहाता यावे, या उद्देशाने हा मोठा बदल करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला जे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. ते पहिल्या फाफपर्यंतचे आहे. जानेवारीच्या मध्यंतरी दुसऱ्या हाफमधील वेळापत्रक निश्चित केले जाईल.

विवो प्रो कबड्डी लीगचे आयोजक 'मशाल स्पोर्ट्स' आठव्या हंगामातील वेळापत्रकाची घोषणा केलीये. 22 डिसेंबर संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून हंगामाला सुरुवात होईल. या हंगामातील सर्व सामने शेरेटन ग्रँड बेंगळुरु व्हाईटफील्ड हॉटल अँण्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT