Rishabh Pant Accident esakal
क्रीडा

Rishabh Pant Accident: पंतच्या अपघातावर प्रतिक्रिया देताना मोदी झाले भावूक, मला तर...

अपघातात पंतला गंभीर दुखापती झाली आहे

रुपेश नामदास

Rishabh Pant Accident: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी पहाटे एका भीषण अपघातात झाला. पंत उत्तराखंडमधील रुरकी या त्यांच्या मूळ गावी जात असताना त्यांची कार मंगलोरजवळ दुभाजकाला धडकली.

बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार , या अपघातात पंतला कपाळावर , उजव्या गुडघ्याला आणि उजव्या हाताच्या मनगटाला तसेच घोटा आणि पायाच्या बोटाला देखील दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीवर देखील जखमा झाल्या आहेत.

ऋषभ पंतच्या कार अपघाताची बातमी समोर आल्यापासून, चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतला जलद बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हजारो चहाते देखील त्याच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ऋषभ पंतच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी ऐकून मला दुःख झाले. तो लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांचे आज सकाळी निधन झाले, त्यानंतर पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये अंतिम संस्कारासाठी पोहोचले आणि विधी पूर्ण करून दिल्लीला परतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Wari: पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल; १० ते १५ जुलैदरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

दीड वर्षीय चिमुकल्याला ३० सेकंदात ८ वेळा आपटलं, आरोपीला फाशीची शिक्षा; ४० दिवसात निकाल, काय घडलं होतं?

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Sant Nilobaray Maharaj Palkhi : निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान

Devendra Fadnavis: 'राजकारणात नाही, मिमिक्रीत असते तर...'; देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना सुनावलं; राजकीय वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT