क्रीडा

दीपक हुडाच्या षटकाराने पोलीस कर्मचारी घायाळ, VIDEO

लखनऊच्या या परभवासह क्रिकेट जगतात दीपक हुडाच्या षटकाराचीही चर्चा रंगली आहे.

धनश्री ओतारी

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये नव्याने पदर्पण केलेला लखनऊचा संघाला एलिमिनेटर सामन्यात आरसीबीकडून १४ धावांनी पराभव स्विकारावा लागला. लखनऊच्या या परभवासह क्रिकेट जगतात दीपक हुडाच्या षटकाराचीही चर्चा रंगली आहे. त्याच्या षटकाराने स्टँडमध्ये उभा असणारा एक पोलिसकर्मचारी जायबंदी झाला आहे.

सामन्यादरम्यान लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज दीपक हुड्डा ने षटकार ठोकला. त्याचा चेंडू थेट प्रेक्षक स्टँडमध्ये पोहचला आणि तेथे उभा असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या हातावर आदळला. चेंडू लागताच पोलिस कळवळताना दिसला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

लखनऊ डावाच्या आठव्या षटकातील पाचव्या चेंडूवर फलंदाच दीपक हुड्डाने षटकार ठोकला. त्याने आरसीबीच्या लेफ्ट आर्म स्पिनर शाहबाज अहमदच्या चेंडूवर षटकार ठोकला. तो चेंडू हवेतून थेट मॅच पाहण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या हातावर आदळला. जोरात चेंडू आदळल्याने पोलिस कर्मचारी कळवळताना दिसला.

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर रॉयल चॅलेंजर बेंगलोरने लखनौ सुपर जायंटचा 14 धावांनी पराभव करत आयपीएलमधून त्यांचा गाशा गुंडाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT