क्रीडा

श्रेयस पाच वर्षांनंतर रणजीमध्ये ; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी सराव

श्रेयस अय्यर आता उद्यापासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट ब गटातील आंध्रविरुद्धच्या लढतीत मुंबईचे प्रतिनिधित्व करेल.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपयशी ठरलेला श्रेयस अय्यर आता उद्यापासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट ब गटातील आंध्रविरुद्धच्या लढतीत मुंबईचे प्रतिनिधित्व करेल. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी फलंदाजीचा सूर गवसण्यासाठी श्रेयस रणजी क्रिकेट खेळणार आहे. याआधी श्रेयसने २०१८मध्ये अखेरचा रणजी सामना खेळला होता. तब्बल पाच वर्षांनंतर तो देशातील अत्यंत मानाच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

अजिंक्य रहाणे व चेतेश्‍वर पुजारा यांना भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. श्रेयस अय्यरकडे भरवशाचा फलंदाज म्हणून बघितले जात आहे. पण कसोटी क्रिकेटची सुरुवात शतकाने केल्यानंतर श्रेयसला फलंदाजीत मोठी झेप घेता आलेली नाही. कसोटीच्या पहिल्या १२ डावांत ५६.७२च्या सरासरीने ६२४ धावा फटकावल्यानंतर श्रेयसला पुढील आठ डावांमध्ये ११.८५च्या सरासरीने फक्त ८३ धावाच करता आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT