World Cup 2023 Final esakal
क्रीडा

World Cup 2023 Final : भारताची वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राहणार स्टेडियममध्ये उपस्थित

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Final : भारताने वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. वनडे वर्ल्डकपची फायनल ही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारतासोबत दुसरा संघ कोण असेल हे आजच्या दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानंतर स्पष्ट होईल. या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. याबाबतचे वृत्त दैनिक जागरणने दिले आहे.

वानखेडेवर झालेल्या भारत - न्यूझीलंड सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकात 4 बाद 397 धावा केल्या. भारताकडून विराट कोहली (117) आणि श्रेयस अय्यरने (105) शतकी खेळी केली. शुभमन गिलने 80 तर रोहित शर्माने 47 धावांचे योगदान दिले. केएल राहुलने 20 चेंडूत 39 धावा करून भारताला 397 धावांपर्यंत मजल मारून दिली.

यानंतर भारताने न्यूझीलंडचा कडवा प्रतिकार मोडून काढत त्यांचा डाव 327 धावात संपवला. भारताच्या मोहम्मद शामीने 54 धावात 7 विकेट्स घेत जवळपास किवींना सगळा संघ स्वतःच उडवला. न्यूझीलंडकडून डेरेल मिचेलने 134 धावाची झुंजार शतकी खेळी केली.

त्याला केन विलियमसनने 69 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली होती. ग्लेन फिलिप्सने देखील 41 धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने देखील प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT