Prithvi Shaw County Cricket  esakal
क्रीडा

Prithvi Shaw : 6, 6, 6, 6, 6, 6, 6... पृथ्वी शॉ पेटलाय! शुभमन गिल फेल होतोय तिकडं पृथ्वी शतकांची माळ लावतोय

अनिरुद्ध संकपाळ

Prithvi Shaw County Cricket : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीजविरूद्ध टी 20 मालिका खेळत आहे. या मालिकेत भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिलची बॅट म्हणावी तशी तळपली नाही. मात्र दुसरीकडे संघातून डच्चू मिळालेला पृथ्वी शॉ मात्र चांगलाच पेटला आहे.

त्याने काऊंटी वनडे स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी करत निवडसमितीचे लक्ष आपल्याकडे वेधले. या शतकी खेळीत त्याने 7 षटकार आणि 15 चौकार मारले. त्याने चौकार आणि षटकारांनीची 102 धावा ठोकल्या. (Prithvi Shaw County Centuries)

काऊंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्पटनशायर संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉला पदार्पणाच्या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. तो हिट विकेट होत दुर्दैवी ठरला. मात्र त्याने दुसऱ्या वनडे सामन्यात 244 धावा ठोकत सर्वांना आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. यानंतर तो थांबला नाही. त्याने तिसऱ्या सामन्यात देखील 125 धावांची शतकी खेळी करत निवडसमितीला आपल्या नावाचा विचार करण्यास भाग पाडले.

डरहम विरूद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉने 125 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर नॉर्थम्पटनशायरने सामना 6 विकेट्सने जिंकला.

डरहमविरूद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉने 76 चेंडूत 125 धावा चोपल्या. त्याने या खेळीत 15 चौकार आणि 7 षटकार मारले. पृथ्वी शॉनेच्या या दमदार फलंदाजीमुळे नॉर्थम्पटनशायरने 198 धावांचे आव्हान सहज पार केले. नॉर्थमप्टनशायरकडून ल्यूक प्रोक्टरने 34 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळेच ते डरहमला 43.2 षटकात 198 धावात रोखू शकले.

पृथ्वी शॉने 9 ऑगस्टला समरसेटविरूद्धच्या सामन्यात 153 चेंडूत 244 धावा चोपल्या होत्या. या खेळीत त्याने 28 चौकार आणि 11 षटकार मारले होते. नॉर्थम्पटनशायरने समरसेटला 87 धावांनी पराभूत केले होते. पृथ्वी शॉ गेल्या काही वर्षापासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने 2021 मध्ये श्रीलंकेविरूद्ध आपला शेवटचा टी 20 सामना खेळला होता. तो संघात पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT