Prithvi Shaw Injury
Prithvi Shaw Injury esakal
क्रीडा

Prithvi Shaw Injury : द्विशतक त्यानंतर शतक! मात्र पृथ्वीच्या कामगिरीवर फिरलं पाणी, काऊंटी क्रिकेटचा झाला 'द एन्ड'

अनिरुद्ध संकपाळ

Prithvi Shaw Injury : भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉने काऊंटी क्रिकेटमध्ये मोठ्या धडाक्यात पदार्पण केले. त्याने नॉर्थम्पटनशायरकडून खेळताना वनडे कप 2023 मध्ये एका सामन्यात 244 तर दुसऱ्या सामन्यात 125 धावांची खेळी केली होती. या त्याच्या खेळीचे भारतात विशेष कौतुक झाले. मात्र पृथ्वी शॉला दुखापतीचा फटका बसला असून त्याला संपूर्ण स्पर्धेला मुकावे लागले आहे.

नॉर्थम्पटनशायर प्रसिद्ध केलेल्या आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हणते की, 'डरहम विरूद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पृथ्वी शॉच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्याच्या गुडघ्याचा स्कॅन करण्यात आला. अपेक्षेपेक्षा त्याची दुखापत जास्तच गंभीर आहे. (Prithvi Shaw County Cricket News)

पृथ्वी शॉने काऊंटी क्रिकेट वनडे कप 2023 मध्ये त्याने दमदार कामगिरी केली. त्याने 4 डावात 429 धावा केल्या आहेत. सोमेरसेटविरूद्धच्या सामन्यात त्याने 153 चेंडूत 244 धावांची तडाखेबाज द्विशतकी खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे नॉर्थम्पटनशायरने 87 धावांनी सामना जिंकला होता.

दरम्यान, पृथ्वीच्या दुखापतीवर नॉर्थम्पटनशायरचे मुख्य प्रशिक्षक जॉन सॅड्लर यांनी निराशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'क्लबसाठी पृथ्वी शॉने छोट्या कालावधीत मोठी कामगिरी केली. मात्र उर्वरित सामन्यासाठी तो आमच्यासोबत असणार नाही ही खूप निराशाजनक बाब आहे.'

सॅड्लर पुढे म्हणाले की, 'त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच त्याचा ड्रेसिंग रूममध्ये देखील मोठा प्रभाव होता. त्याच्याइतकं सामना जिंकण्यासाठी उत्सुक कोण नव्हतं. तो आमच्यासाठी चांगलं प्रेरणास्थान होतं. तो लवकारत लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही त्याला आमच्या सदिच्छा देत आहोत. आशा आहे की तो पुन्हा धावा करायला लागले.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT