prithvi shaw on selection for-ind vs nz t20 series sakal
क्रीडा

IND vs NZ: 'इतके कॉल अन् मेसेज की मोबाईल...', पृथ्वी झाला भावूक

''मी वॉशरूम मध्ये जाण्यासाठी उठलो आणि मी माझ्या फोन कडे पहिले''

Kiran Mahanavar

India vs New Zealand 1st T20 : युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ जवळपास दीड वर्षानंतर टीम इंडियात परतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याची निवड करण्यात आली आहे. त्याने BCCI.tv ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली तेव्हा तो झोपला होता आणि त्याचा फोन सायलेंट होता. जेव्हा तो वॉशरूमला जाण्यासाठी उठला तेव्हा त्याने त्याचा फोन पाहिला आणि तेथे बरेच कॉल आणि मेसेज आले होते. त्याचा फोन हॅंग झाला.

पृथ्वी शॉ BCCI.tv वर म्हणाला की, 'मी बराच काळ या संघाचा भाग नव्हतो, पण परत आल्याने मला आनंद होत आहे. माझे वडीलही खूप खुश आहेत. 10.30 च्या सुमारास रात्री उशिरा संघाची घोषणा झाली. मी झोपलो होतो आणि मला कळले तेव्हा माझा फोन सायलेंट होता. मी वॉशरूम मध्ये जाण्यासाठी उठलो आणि मी माझ्या फोन कडे पहिले तर खूप कॉल आणि मेसेज आले होते. माझा फोन हँग झाला होता. मी विचार करत होतो की काय झालं. मग मी पाहिले की माझी T20 साठी निवड झाली आहे.

बराच काळ टीम इंडियामध्ये निवड न झाल्याबद्दल पृथ्वी शॉ म्हणाला, “मी 5 कसोटी सामने खेळलो आणि त्यानंतर मी काही काळ बाहेर राहिलो. यापूर्वी मी इतकी फलंदाजी केली नाही. मी सुमारे 40-45 मिनिटे फलंदाजी करायचो. त्यानंतर मी माझे तंत्र परिपूर्ण करण्यासाठी काही तास मुंबईत माझ्या प्रशिक्षकासोबत फलंदाजी करण्यास सुरुवात केली. मी वर्तमानात जगणे पसंत करतो त्यामुळे मी भविष्याचा फारसा विचार करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT