Prithvi Shaw Reaction esakal
क्रीडा

Prithvi Shaw Reaction : काऊंटी क्रिकेटमध्ये द्विशतक, टीम इंडियातील पुनरागमन... पृथ्वी शॉ म्हणतोय तरी काय?

अनिरुद्ध संकपाळ

Prithvi Shaw Reaction : भारतीय संघातून बराचकाळ दूर असलेल्या पृथ्वी शॉने इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याची निर्णय घेतला. अनेक क्रिकेटपूटंच्या कारकिर्दीला कलाटणी देणाऱ्या काऊंटी क्रिकेटच्या दुसऱ्याच सामन्यात पृथ्वी शॉने मोठा धमाका केला.

नॉर्थम्पटनशायरकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने इंग्लिश टूर्नामेंट रॉयल लंडन वनडे कप 2023 मध्ये 153 चेंडूत 244 धावांची झंजावाती खेळी केली. या खेळीनंतर पृथ्वी शॉ आता टीम इंडियात परतणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Prithvi Shaw County Cricket)

मात्र याबाबत खुद्द पृथ्वी शॉ काय विचार करतोय हे महत्वाचं आहे. त्याने द्विशतक ठोकल्यानंतर टीम इंडियातील पुनरागमनाबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या पृथ्वी शॉने काऊंटीच्या वनडे सामन्यात द्विशतकी खेळी केल्यानंतर प्रतिक्रिया दिली की आता त्याला निवड समिती त्याच्याबद्दल काय विचार करते याची थोडी देखील चिंता नाही.

पृथ्वी म्हणाला की, मी एवढी मोठी खेळी करणार आहे याची जरा देखील कल्पना नव्हती. माझ्या डोक्यात फक्त 227 धावा होत्या. ती माझी सर्वोच्च खेळी होती. मात्र मी व्हाईटीशी बोललो आणि पुढे खेळत गेलो.

मी कायम संघासाठी आधी खेळतो

पृथ्वी शॉने सांगितले की मी कोणत्याही संघाकडून खेळताना आधी संघभावनेचा विचार करतो. मी संघासाठी खेळतो. संघासाठी सामना जिंकून द्यावा असा माझा प्रयत्न असतो. मी असा खेळाडू आहे जो संघाचा विचार आधी करतो. त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक धावसंख्येकडे कधी लक्ष देत नाही. जर माझ्या संघाला मी ज्या प्रकारे खेळतोय त्याने विजय मिळत असेल तर मी तसा खेळ करणं सुरू ठेवलं पाहिजे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT