Prithvi Shaw Girlfriend Controversy : esakal
क्रीडा

Prithvi Shaw Girlfriend : सपना गिलचे प्रकरण संपले मात्र आता गर्लफ्रेंडने... पृथ्वी शॉचे दिवस फिरले?

अनिरुद्ध संकपाळ

Prithvi Shaw Girlfriend Controversy : भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा त्याच्या खेळापेक्षा मैदानाबाहेरील भानगडींमुळेच सध्या जास्त चर्चेत आहे. नुकतेच सपना गिलने विनयभंगाच्या आरोप प्रकरणात पोलिसांच्या अहवालात त्याला क्लीन चीट मिळाली आहे. मात्र दिलासा मिळाल्याचा आनंद जास्त काळ टिकणार नाही असं दिसतंय.

पृथ्वी शॉ आणि त्याची गर्लफ्रेंड निधी तापडिया यांचे ब्रेकअप झाल्याची अफवा पसरली आहे. काही वृत्तांमध्ये दावा करण्यात येत आहे की या दोन प्रेमी युगलांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. यापूर्वी पृथ्वी शॉने वॅलेंटाईन डेला एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये पृथ्वीने निधी ही आपली पत्नी असल्याचे सांगितले होते. मात्र काही वेळाने ही पोस्ट हटवण्यात आली होती.

पृथ्वी शॉ हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. एकेकाळी भारताचा भविष्यातील उत्तम फलंदाज म्हणून पृथ्वी शॉची चर्चा असायची. त्याच्या नेतृत्वात भारताच्या 19 वर्षाखालील संघाने वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर त्याची निवड भारतीय संघात झाली. त्याने भारताकडून काही चांगल्या खेळी देखील केल्या. मात्र जेव्हापासून तो भारतीय संघातून बाहेर फेकला गेला तेव्हापासून तो आपल्या अडचणीत स्वतःच वाढ करत असल्याचे दिसून येत आहे.

देशांतर्गत स्पर्धांमधील सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर पृथ्वीला न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले. मात्र त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. आयपीएल 2023 मध्ये देखील त्याला लैकिकास साजेसा खेळ करता आला नाही. तो दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेईंग 11 मध्ये आत बाहेर होत राहिला.

सध्या पृथ्वी शॉ दुलीप ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागाकडून खेळतो आहे. त्याने मध्ये विभागाविरूद्ध पहिल्या डावात 26 आणि दुसऱ्या डावात 25 धावा केल्या आहेत. तो पुन्हा एकदा आपला फॉर्म परत मिळवण्यात अपयशी ठरला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीला दोन सामन्यांतही डेब्यू का नाही? अखेर टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने सांगितलं खरं कारण

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील तरुण गोल्डन ट्रँगलच्या जाळ्यात, उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

'सगळ्या अ‍ॅक्टरचे अफेअर्स असतात' फराहने प्रश्न विचारताच रितेशने दिली 'अशी' प्रतिक्रिया, Viral Video

Sonai News : सोनईतील सावित्री सत्यवानासाठी आधार‘वड’; पतीला कोरोनात अंधत्व आल्यानंतर कुटुंबासाठी ‘ती’चा अहोरात्र संघर्ष

SCROLL FOR NEXT