Prithvi Shaw Syed Mushtaq Ali Trophy 2022  esakal
क्रीडा

Prithvi Shaw : पृथ्वी भावाने केली पुन्हा एकदा हवा! 61 चेंडूत ठोकल्या 134 धावा!

अनिरुद्ध संकपाळ

Prithvi Shaw Syed Mushtaq Ali Trophy 2022 : मुंबईचा भिडू पृथ्वी शॉने पुन्हा एकदा आपल्या बॅटने सतत डावलणाऱ्या निवडसमितीला चोथ प्रत्युत्तर दिले. पृथ्वी शॉने सईद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीत आसामविरूद्धच्या सामन्यात 46 चेंडूत शतक ठोकत सर्वांचे लक्ष पुन्हा आपल्याकडे वेधले. त्याने आपली ही शतकी खेळी 61 चेंडूत 134 धावा ठोकून संपवली.

मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉने पुन्हा एकदा धमाका केला. त्याने सईद मुश्ताक अली ट्रॉफीत आसामविरूद्ध 61 चेंडूत 134 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने आसामसमोर 20 षटकात 3 बाद 230 धावांचा डोंगर उभारला. पृथ्वी शॉने आपली ही शतकी खेळी 13 चौकार आणि 9 षटकारांनी सजवली.

पृथ्वी शॉ बरोबरच मुंबईकडून यशस्वी जैसवालने देखील दमदार खेळी केली. त्याने 30 चेंडूत 42 धावा केल्या. तर शिवम दुबेने एक षटकात आणि दोन चौकार मारत 7 चेंडूत नाबाद 17 धावांची आक्रमक खेळी केली. सर्फराज खानने 15 चेंडूत 15 तर अमन हकिम खानने 7 चेंडूत 15 धावा केल्या. आसामकडून रियान पराग, रोशन आलम राज्जाकुद्दीन अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Latest Marathi News Update LIVE: पुण्यात सलग तीन दिवस १० अंशांखाली तापमान

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

Pune Election 2025 : निवडणुकीच्या रिंगणातून माघार! पहिल्या दिवशी लोणावळ्यात नगराध्यक्ष, तर जिल्ह्यातून १४ सदस्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

SCROLL FOR NEXT