Prithvi Shaw physical fight with girl video goes viral on social media ind vs aus cricket news 
क्रीडा

Prithvi Shaw : नवा ट्विस्ट; क्रिकेटपटू शॉने मद्याच्या नशेत गैरवर्तन केल्याचा पीडितेकडून दावा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - Prithvi Shaw Viral Video: भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ अडचणीत आला आहे. पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हाणामारी स्पष्टपणे दिसून येत आहे. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

क्रिकेटपटू पृथ्वी शॉ मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने आपल्या बॅटने तरुणीला मारहाण केली, असा आरोप तिच्या वकिलाने केला आहे. ओशिवरा पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सपना गिल असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ज्या आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी ती एक आहे.

गिलचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी एएनआयशी बोलताना आरोप केला की, शॉने महिलेला आपल्या बॅटने मारले. पंचतारांकित हॉटेलमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिल पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढण्यासाठी फॅन म्हणून गेली होती. ते पार्टी करत होते, पृथ्वी शॉ मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने हातात बॅट घेतली होती आणि त्याने आपल्या बॅटने सपनाला मारले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल केला,' असा दावा देशमुख यांनी केला.

या क्रिकेटपटूविरोधात खटला दाखल करणार असल्याचे वकिलांनी सांगितले. आता आम्ही पृथ्वी शॉवर गुन्हा दाखल करू कारण तो मद्यधुंद होता. मद्यधुंद अवस्थेत त्याने गाडीही चालवली आणि त्याने एका दुचाकीलाही धडक दिल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्याने इंफ्लुएंसर सपनाला बॅटने मारहाण केली. त्याच्यावर कलम ३५४, ५०९, ३३४ अन्वये गुन्हा दाखल करणार आहोत.

सपना आणि पृथ्वीचे एकमेकांशी कोणतेही नाते नाही, ती फक्त त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गेली होती. आम्ही इन्फ्लुएंसर जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यानंतर आम्ही या क्रिकेटपटूविरोधात एफआयआर दाखल करू. सध्या सपना गिल सध्या अटकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT