क्रीडा

Pro Kabaddi:..अन् शेवटच्या मिनिटाला पायरेट्सचा 'गेम' झाला! ८ पॉईंट्सने मागे असणाऱ्या बेंगलुरु बुल्सने 'असा' मिळवला विजय

पटना पायरेट्स आणि बेंगलुरु बुल्स या संघामध्ये सोमवारी (दि.८ जानेवारी) सामना खेळवला गेला. या चित्त थरारक सामन्यात बेंगलुरु बुल्स संघाने शेवटच्या मिनिटाला विजय मिळवला.

Manoj Bhalerao

Pro Kabaddi Seseason 10 Bengluru Bulls Vs Patna Pirates: प्रो कबड्डी स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील सामने मुंबई या ठिकाणी खेळवले जात आहेत. पटना पायरेट्स आणि बेंगलुरु बुल्स या संघामध्ये सोमवारी (दि.८ जानेवारी) सामना खेळवला गेला. या चित्त थरारक सामन्यात बेंगलुरु बुल्स संघाने शेवटच्या मिनिटाला विजय मिळवला. या विजयात डिफेंडर सुरजीत सिंग याचा मोलाचा वाटा होता.

दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बेंगळुरू बुल्स संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पटना पायरेटस संघावर 34-33 असा थरारक विजय मिळवला. बेंगळुरू बुल्सकडून डिफेंडर सुरजीत सिंग(8गुण) याने तर, पटना पायरेटस कडून कर्णधार नीरज कुमार(5गुण) याने सुरेख कामगिरी केली.

एनएससीआय स्टेडियम झालेल्या या लढतीत बेंगळुरू बुल्स चा भरतची संघातील अनुपस्थिती सामन्यात सुरुवातीला जाणवली. दोन्ही संघांनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला व तिसऱ्या मिनिटाला 3-3 अशी बरोबरी होती. मात्र, 14व्या मिनिटाला पटना संघाने जोरदार खेळ करत बेंगळुरू बुल्सवर पहिला लोन चढवला व सामन्यात 16-8 अशी आघाडी मिळवली.

पूर्वार्धात पटना संघ मजबूत स्थितीत होता. 17व्या मिनिटाला बेंगळुरूच्या विकास कंडोलाला डू ऑर डायमध्ये बाद केले व आपली आघाडी 20-12 अशी आणखी मजबूत केली. पूर्वार्धात ही आघाडी कायम होती.

मध्यंतराला बेंगळूरु संघाने सुशील आणि रक्षित यांना संधी दिली. पण त्यांना संधीचे सोने करता आले नाही. 27व्या मिनिटाला विकास कंडोलाची पकड नीरजने पकड करून पटना संघाची आघाडी 10 गुणांच्या फरकाने 24-14 अशी वाढवली. बेंगळूरुकडून सचिन नरवालने सुरेख खेळ करून संघाला गुण मिळवून दिले. तर, सुरजीतच्या हाय 5 गुणामुळे ही आघाडी आणखी कमी झाली..पण पटनाकडून सचिनने सुपर रेड करताना संघाला 3गुण मिळवून दिले.

पिछाडीवर असलेल्या बेंगळूरु बुल्स च्या सुरजीत आणि रान सिंग यांनी सुपर टॅकल करून संघाचे आव्हान कायम राखले. सामना संपण्यास तीन मिनिटे शिल्लक असताना बेंगळूरु बुल्स 33-25 असा आठ गुणांच्या फरकाने पिछाडीवर होता. बेंगळूरु संघाच्या सुशीलने महत्वपूर्ण दोन गुण मिळवले. यावेळी पटना संघाचा एकच गडी मैदानात होता. सूरजीतने संदीप कुमार ला सुपर टॅकलकरून पटना संघावर मोक्याच्या क्षणी लोन चढविला व संघाला एक गुणाने आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवत बेंगळूरु बुल्स संघाने पटना पायरेटसवर विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजार वाढीसह उघडला; निफ्टी 80 अंकांनी वधारला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

IND vs AUS : रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घेणार? BCCI ने स्पष्ट केली भूमिका; ही त्यांची शेवटची मालिका...

Zilla Parishad Politics : जिल्हा परिषदेसाठी कायपण! ‘सरकार’, ९६ कुळी, म्हणून घेणारे होणार ‘कुणबी’; स्वतःसह सौभाग्यवतींचेही काढले दाखले

Missing Lawyer Case : तीन महिन्यांपासून वकील बेपत्ता, शिंदे गटाच्या 'या' आमदारावर गंभीर आरोप; किशोरी आरडे म्हणाल्या, 'माझ्या पतीच्या जीवाला..'

Latest Marathi News Live Update : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणासंदर्भात एसआयटी/सीआयडीने अटक केलेल्या श्यामकानु महंता, सिद्धार्थ शर्मा आणि इतरांना आज न्यायालयात हजर करणार

SCROLL FOR NEXT